Join us

Womens T20 : मुंबईकर जेमिमा रॉड्रीग्जची फटकेबाजी, भारतीय महिलांचा मालिका विजय

Womens T20 : भारतीय महिला क्रिकेट संघाने पाच सामन्यांच्या ट्वेंटी-20 मालिकेत श्रीलंकेवर 4-0 असा विजय मिळवला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2018 15:05 IST

Open in App
ठळक मुद्देजेमिमा रॉड्रीग्जला स्पर्धेतील सर्वोत्तम फलंदाजाचा मान.

कोलंबो : भारतीय महिला क्रिकेट संघाने पाच सामन्यांच्या ट्वेंटी-20 मालिकेत श्रीलंकेवर 4-0 असा विजय मिळवला. मंगळवारी झालेल्या अंतिम सामन्यात भारताने 51 धावांनी विजय मिळवला. मुंबईकर जेमिमा रॉड्रीग्जने पुन्हा एकदा ( 46) दमदार फटकेबाजी केली. तिला हरमनप्रीतने 63 धावांची खेळी करताना चांगली साथ दिली. भारताच्या 156 धावांच्या प्रत्युत्तरात श्रीलंकेचा संपूर्ण संघ 17.4 षटकांत 105 धावांवर तंबूत परतला.  जेमिमाने 31 चेंडूंत 46 धावा चोपल्या आणि हरमनप्रीतने 38 चेंडूंत 63 धावांची आतषबाजी केली. फलंदाजांच्या कामगिरीनंतर फिरकी गोलंदाज दिप्ती शर्मा, पूनम यादव आणि राधा यादव यांनी श्रीलंकेला धक्के दिले.   

टॅग्स :भारतीय महिला क्रिकेट संघमहिला टी-२० क्रिकेट