Ranji Trophy Final Mumbai vs Madhya Pradesh : उपांत्यपूर्व व उपांत्य फेरीतील शतकी खेळीनंतर यशस्वी जैस्वालने ( Yashasvi Jaiswal) याने रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यातही दमदार खेळी केली. कर्णधार पृथ्वी शॉ आणि यशस्वी यांनी मुंबईला चांगली सुरुवात करून देताना 87 धावांची भागीदारी केली. पण, मध्य प्रदेशच्या गोलंदाजांनी पुनरागमन करताना मुंबईच्या धावांचा वेग संथ केला. त्यामुळे मुंबईला दिवसअखेर 5 बाद 248 धावा करता आल्या.
पृथ्वीने 79 चेंडूंत 5 चौकार व 1 षटकारांसह 47 धावांची खेळी केली. त्यानंतर मध्य प्रदेशने टप्प्याटप्प्याने मुंबईला धक्के दिले. अरमान जाफर ( 26) व सुवेध पारकर ( 18) यांच्या अपयशाने मुंबईची डोकेदुखी वाढवली होती. पण, यशस्वी खिंड लढवत होता. तो 163 चेंडूंचा सामना करून 7 चौकार 1 षटकार खेचून 78 धावांवर बाद झाला. सर्फराज व हार्दिक तामोरे यांनी मुंबईचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. सारांश जैनने ही भागीदारी तोडली. तामोरे 24 धावांवर बाद झाला. सर्फराज 40 धावांवर खेळतोय आणि दुसऱ्या दिवशी सर्फराजच्या खांद्यावर मुंबईची भिस्त असणार आहे.
मध्य प्रदेशच्या अनुभव अगरवाल आणि जैन यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली, तर कुमार कार्तिकेयाने 1 विकेट घेतली.