भारत-न्यूझीलंड सामन्यादरम्यान स्टेडियममध्ये आग लावू, मुंबई पोलिसांच्या ट्विटरवर धमकी

या धमकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी सामन्यादरम्यान चोख पोलिस बंदोबस्त ठेवला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2023 12:34 PM2023-11-15T12:34:21+5:302023-11-15T12:42:04+5:30

whatsapp join usJoin us
Mumbai Police threatens to set fire to stadium during India-New Zealand match on Twitter | भारत-न्यूझीलंड सामन्यादरम्यान स्टेडियममध्ये आग लावू, मुंबई पोलिसांच्या ट्विटरवर धमकी

भारत-न्यूझीलंड सामन्यादरम्यान स्टेडियममध्ये आग लावू, मुंबई पोलिसांच्या ट्विटरवर धमकी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबई :  वर्ल्ड कप 2023 मधील भारत आणि न्यूझीलंडमध्ये आज पहिला सेमी फायनल सामना आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर हा सामना पार पडणार आहे. दरम्यान, मुंबईत होणाऱ्या या भारत-न्यूझीलंड क्रिकेट सामन्यादरम्यान घातपात करण्याची धमकी मुंबई पोलिसांच्या ट्विटरवर अज्ञात व्यक्तीकडून देण्यात आली आहे. या धमकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी सामन्यादरम्यान चोख पोलिस बंदोबस्त ठेवला आहे.

धमकी देणाऱ्या व्यक्तीने मुंबई पोलिसांच्या ट्विटरला टॅग करत बंदूक, हँडग्रेनेड आणि काडतुस असलेला फोटो पोस्ट केला आहे. याचबरोबर, भारत-न्यूझीलंड सामन्यादरम्यान आम्ही आग लावू, असा मेसेज देणारा फोटोही धमकीच्या मेसेजसोबत पोस्ट केला आहे. दरम्यान, या घटनेची गंभीर दखल घेत मुंबई पोलिसांनी स्टेडियममधील आणि परिसरातील बंदोबस्त वाढवून सुरक्षा व्यवस्थेतही वाढ केली आहे. ठिकठिकाणी बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. 

सामना पाहण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे आयडी कार्ड तपासून, त्यांची ओळख पटवून मगच आत पाठवण्यात येत आहे. तसेच बॉम्बसोधक पथकही स्टेडियममध्ये दाखल झाले असून कसून तपासणी करण्यात येत आहे. भारत-न्युझीलंड सामन्यादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासासाठी मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

भारत आणि न्यूझीलंड दरम्यान आज दुपारपासून हा सामना सुरू होणार असून प्रेक्षकांचा उत्साह वाढला आहे. दिवाळीच्या सुट्ट्या असल्याने या सामन्याला मोठी गर्दी होणार आहे. या सामन्यासाठी प्रेक्षकांसह मुंबई पोलिस देखील सज्ज झाले आहेत. या सामन्याआधी मुंबई पोलिसांचा बंदोबस्त असून प्रेक्षकांसाठी चांगली सोय केली आहे. पण, त्यापूर्वीच ट्विटरवरून ही धमकी मिळाल्याने थोडी तणावाची स्थिती निर्माण झाली आहे.

प्रेक्षकांनी आवश्यक काळजी घेण्याचे आवाहन
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील हा सामना पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होणार आहे. हजारो संख्येने प्रेक्षक वानखेडेवर दाखल होत आहेत. त्यामळे मुंबई पोलिसांनी प्रेक्षकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी आणि पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर करावा, असे आवाहन केले आहे. तसेच, सर्व सुरळीत पार पडावे, काहीही गोंधळ होऊ नये यासाठी पोलिसांनी काही अटी घातल्या आहेत. स्टेडियममध्ये प्रवेश करताना काही गोष्टींवर पोलिसांनी बंदी घातली आहे. 

स्टेडियममध्ये या गोष्टींवर बंदी
वानखेडे स्टेडियमच्या सर्व दहा गेट समोरील रस्त्यावर पार्किंगला मनाई केली आहे. एक किलोमीटरच्या परिघात पोलिसांनी केली पार्किंगची व्यवस्था केली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव पेन, पेन्सिल, मार्कर, कोरे कागद, बॅनर्स, पोस्टर्स तसेच बॅग, पॉवर बँक, नाणी तसेच ज्वलनशील पदार्थ, आक्षेपार्ह वस्तू, तंबाखूजन्य पदार्थ आणू नयेत, अशा सूचना पोलिसांनी दिल्या आहेत.
 

Web Title: Mumbai Police threatens to set fire to stadium during India-New Zealand match on Twitter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.