मुंबईने अतिरिक्त वेगवान गोलंदाज खेळवायला हवा

या विजयामुळे मुंबई इंडियन्सने आव्हान कायम राखले, पण त्याचसोबत बलाढ्य चेन्नई सुपरकिंग्जचा पराभव करीत त्यांचा उंचावलेला आत्मविश्वास आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात त्यांच्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2018 01:13 AM2018-04-30T01:13:03+5:302018-04-30T01:13:03+5:30

whatsapp join usJoin us
Mumbai need to play an additional fast bowler | मुंबईने अतिरिक्त वेगवान गोलंदाज खेळवायला हवा

मुंबईने अतिरिक्त वेगवान गोलंदाज खेळवायला हवा

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

हर्षा भोगले लिहितात...
या विजयामुळे मुंबई इंडियन्सने आव्हान कायम राखले, पण त्याचसोबत बलाढ्य चेन्नई सुपरकिंग्जचा पराभव करीत त्यांचा उंचावलेला आत्मविश्वास आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात त्यांच्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. गुणतालिकेतील स्थान बघून या संघाच्या क्षमतेची कल्पना करता येणार नाही.
चेन्नईविरुद्धच्या लढतीत फलंदाजीची बाजू मजबूत करण्यासाठी मुंबई इंडियन्सने एक गोलंदाज कमी खेळविला. त्यामुळे संघातील साशंकतेच्या भावनेची कल्पना आली. जेपी ड्युमिनी चांगला खेळाडू असून परिस्थितीनुरुप एक-दोन षटके गोलंदाजी करू शकतो, पण त्याला खेळविणे म्हणजे बेन कटिंगला आठव्या स्थानावर फलंदाजी करावे लागणे, असे होते. माझ्या मते मुंबई इंडियन्ससाठी अतिरिक्त वेगवान गोलंदाजाला संधी देणे चांगला पर्याय ठरला असता, विशेषत: अ‍ॅडम मिल्ने. पुढच्या टप्प्यात त्यांनी हा पर्याय वापरला तर मला आश्चर्य वाटणार नाही.
मुंबई इंडियन्सने आतापर्यंत दोन सामने जिंकले आहेत. या दोन्ही लढतींमध्ये रोहित शर्माचे योगदान महत्त्वाचे ठरले. याकडे दोन बाजंूनी बघता येईल. तुमच्या मॅचविनर खेळाडूने दोनदा तुम्हाला सामना जिंकून देणे चांगले आहे, पण फलंदाजी क्रमामध्ये तो खालच्या क्रमांकावर खेळणे चकित करणारे आहे. रोहितच्या फलंदाजीची शैली बघितल्यानंतर डावाच्या दुसºया टप्प्यात फलंदाजी करणे त्याला विशेष आवडत नसल्याचे दिसून येते. डावाच्या दुसºया भागात त्याने खेळपट्टीवर जम बसविल्यानंतरही तो तुम्हाला सामना जिंकून देण्याची शक्यता कमी असते. ही छोटी पण आक्रमक खेळी होती, पण त्यामुळे हार्दिक पंड्याचा आत्मविश्वास उंचावला. त्याला तळाच्या फळीत खेळविण्यापेक्षा वरच्या फळीत खेळविणे योग्य ठरेल. आगामी सामन्यांमध्ये तो त्याचा भाऊ कृणालच्या आधी पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आला तर आश्चर्य वाटायला नको. मुंबई इंडियन्स व दिल्ली डेअरडेव्हिल्स संघांनी विजय नोंदवत गुणतालिकेत चुरस निर्माण केली आहे. तळाच्या स्थानावर असलेले संघ आणखी काही लढतींमध्ये विजय नोंदवण्यात यशस्वी ठरले तर आयपीएलचा दुसरा टप्पा रंगतदार होईल. (टीसीएम)

Web Title: Mumbai need to play an additional fast bowler

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.