Join us

मुंबई इंडियन्स विजयी मार्गावर परतण्यास सज्ज, आज हैदराबादविरुद्ध लढत

सलामीचा सामना चेन्नई सुपरकिंग्जविरुद्ध अनपेक्षित गमावल्यानंतर गतविजेते मुंबई इंडियन्स गुरुवारी झुंजार सनरायझर्स हैदराबादविरुद्ध दोन हात करण्यास मैदानात उतरतील.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2018 03:27 IST

Open in App

हैदराबाद : सलामीचा सामना चेन्नई सुपरकिंग्जविरुद्ध अनपेक्षित गमावल्यानंतर गतविजेते मुंबई इंडियन्स गुरुवारी झुंजार सनरायझर्स हैदराबादविरुद्ध दोन हात करण्यास मैदानात उतरतील.यंदाच्या आयपीएलमध्ये हैदराबादची गोलंदाजी सर्वांत मजबूत आहे. दुसरीकडे मुंबई संघात स्टार खेळाडूंचा भरणा आहे. असे असले तरी आयपीएलमध्ये होणारी अपयशाने सुरुवात हा मुंबईकरांचा इतिहास आहे. असे असले तरी कर्णधार रोहित शर्माला फलंदाजांकडून अधिक अपेक्षा असतील. एविन लेविस, पोलार्ड, रोहित अशी आक्रमक फलंदाजी असलेल्या मुंबईकडे कृणाल-हार्दिक बंधूच्या रूपातील निर्णायक अष्टपैलू खेळाडूही आहे.

टॅग्स :आयपीएल 2018मुंबई इंडियन्स