Join us  

Mumbai Indians : सायमन कॅटिच मुख्य प्रशिक्षक, Hashim Amla देणार फलंदाजीचे धडे; मुंबई इंडियन्सची मोठी घोषणा

इंडियन प्रीमिअर लीग २०२३मध्ये मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात व कोचिंग स्टाफमध्ये बदल पाहायला मिळणे अपेक्षित आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2022 11:53 AM

Open in App

इंडियन प्रीमिअर लीग २०२३मध्ये मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात व कोचिंग स्टाफमध्ये बदल पाहायला मिळणे अपेक्षित आहे. नवीन संघबांधणी केल्यानंतर पाचवेळा विजेतेपद पटकावणाऱ्या MI ला आयपीएल २०२२मध्ये गुणतालिकेत तळावर समाधान मानावे लागले होते. मुंबई इंडियन्सचा विस्तार वाढला आहे. रिलायन्सचे मालकी हक्क असलेल्या या फ्रँचायझीने दक्षिण आफ्रिका व युएई येथे होणाऱ्या ट्वेंटी-२० लीगमध्ये संघ खरेदी केला आहे. त्यामुळे आता MI फ्रँचायझीच्या वरच्या स्तरावर बदल होताना दिसतोय. मुख्य प्रशिक्षक माहेला जयवर्धने ( Mahela Jayawardene) व क्रिकेट डेव्हलपमेंट प्रमुख झहीर खान ( Zaheer Khan) यांच्यावर अनुक्रमे Global Head of Performance व  Global Head of Cricket Development ही जबाबदारी सोपवली गेली आहे. त्यात आज मुंबई इंडियन्सने त्यांच्या आफ्रिकन लीगमधील MI Cape Town संघासाठी कोचिंग स्टाफची घोषणा केली.

दिग्गज यष्टिरक्षक-फलंदाज मार्क बाऊचर हे MI Cape Town चे मुख्य प्रशिक्षक असतील असा अंदाज व्यक्त केला जात होता. पण, ऑस्ट्रेलियन दिग्गज सायमन कॅटिच ( Simon Katich ) यांची मुख्य प्रशिक्षक म्हणून निवड झाली आहे.  MI Cape Town संघाने ३ परदेशी, दक्षिण आफ्रिकेचा १ कॅप्ड व आफ्रिकेच्या १ अनकॅप्ड खेळाडूला करारबद्ध केले आहे. कागिसो रबाडा, अफगाणिस्तानचा राशिद खान, इंग्लंडचा लिएम लिव्हिंगस्टोन व सॅम कुरन आणि आफ्रिकेचा अनकॅप्ड खेळाडू डेवॉल्ड ब्रेव्हिस यांना करारबद्ध केले आहे. दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज फलंदाज हाशिम आमला ( Hashim Amla) हा फलंदाज प्रशिक्षक असणार आहे, तर जेम्स पॅमेंटकडे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक, रॉबिन पीटरसन जनरल मॅनेजर असणार आहे.  

हाशिम आमलाच्या नावावर वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद २०००, ३०००, ४०००, ५००० आणि ६००० धावा करण्याचा विक्रम आहे. ''MI Cape Town संघासोबत काम करण्याची संधी मिळाल्याचे मी भाग्य समजतो. MI मालक, व्यवस्थापन व माझा मॅनेजर यांचे सर्वांचे आभार. स्थानिक क्रिकेटला एक योग्य व्यासपीठ उपलब्ध होणार आहे, त्याचा आनंद आहे. माझा अनुभव या खेळाडूंना घडवण्यासाठी वापरणार आहे,''असे आमला म्हणाला. 

टॅग्स :मुंबई इंडियन्सद. आफ्रिकाहाशिम आमला
Open in App