Join us  

हे तुम्हाला माहित नसेल! आयपीएल इतिहासात MI, KKR हे दोनच संघ असे आहेत की...

चेन्नई सुपर किंग्स ९वेळा आयपीएलचा उद्घाटनीय सामना खेळणार आहे आणि अन्य फ्रँचायझीमध्ये हा आकडा सर्वाधिक आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2024 4:36 PM

Open in App

Indian Premier League 2024 : इंडियन प्रीमिअर लीग २०२४ ची प्रतीक्षा आता क्षणिक राहिली आहे. ४८ तासांहून कमी कालावधीत आता आयपीएल २०२४ चा पहिला सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू असा खेळवला जाणार आहे. पुन्हा एकदा महेंद्रसिंग धोनीची शेवटची आयपीएल म्हणून चाहते भावनेच्या भरात स्टेडियमवर तौबा गर्दी करतील, ऑन लाईन स्ट्रीमिंगचे सारे विक्रम तुटलेले पाहायला मिळतील. जूनमध्ये होऊ घातलेला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या दृष्टीनेही आयपीएल महत्त्वाची आहे.

 गतविजेता चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू असा सलामीचा सामना होईल. चेन्नई सुपर किंग्स ९वेळा आयपीएलचा उद्घाटनीय सामना खेळणार आहे आणि अन्य फ्रँचायझीमध्ये हा आकडा सर्वाधिक आहे. मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद अनुक्रमे हार्दिक पांड्या व पॅट कमिन्स या नव्या कर्णधारांच्या नेतृत्वाखाली खेळणार आहेत. आयपीएलचे हे १७ वे वर्ष आहे आणि इतक्या वर्षात मुंबई इंडियन्स व कोलकाता नाइट रायडर्स हे दोनच संघ आहेत की ज्यांनी सुरुवातीपासून ते आतापर्यंत नावाच्या स्पेलिंगमध्ये बदल केलेला नाही.

संघ आणि त्यांची बदललेली नावं...

  • किंग्स इलेव्हन पंजाब ( Kings XI Punjab) - पंजाब किंग्स ( Punjab Kings )
  • दिल्ली डेअरडेव्हिल्स ( Delhi Daredevils ) - दिल्ली कॅपिटल्स ( Delhi Capitals ) 
  • राजस्थान रॉयल्स - मॅच फिक्सिंग प्रकरणामुळे बंदी
  • चेन्नई सुपर किंग्स - मॅच फिक्सिंग प्रकरणामुळे बंदी
  • सनरायझर्स हैदराबाद ( Sunrisers Hyderabad) - डेक्कन चार्जर्स ( Hyderabad Deccan Chargers) 
  • गुजरात टायटन्स - २०२२ मध्ये एन्ट्री
  • लखनौ सुपर जायंट्स - २०२२ मध्ये एन्ट्री
  • रॉयल चॅलेंजर्स बंगलोर ( Royal Challengers Bangalore) - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Royal Challengers Bengaluru ) 

 

IPL 2024 वेळापत्रक

  • २२ मार्च - चेन्नई सुपर किंग्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, रात्री ८ वा.पासून, चेन्नई
  • २३ मार्च - पंजाब किंग्स वि. दिल्ली कॅपिटल्स, दुपारी ३.३० वा. पासून, मोहाली
  • २३ मार्च - कोलकाता नाइट रायडर्स वि. सनरायझर्स हैदराबाद, रात्री ८ वा. पासून, कोलकाता
  • २४ मार्च - राजस्थान रॉयल्स वि. लखनौ सुपर जायंट्स, दुपारी ३.३० वा.पासून, जयपूर
  • २४ मार्च - गुजरात टायटन्स वि. मुंबई इंडियन्स, रात्री ८ वा. पासून, अहमदाबाद
  • २५ मार्च - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. पंजाब किंग्स, रात्री ८ वा. पासून, बंगळुरू
  • २६ मार्च - चेन्नई सुपर किंग्स वि. गुजरात टायटन्स, रात्री ८ वा.पासून, चेन्नई
  • २७ मार्च - सनरायझर्स हैदराबाद वि. मुंबई इंडियन्स, रात्री ८ वा. पासून, हैदराबाद
  • २८ मार्च - राजस्थान रॉयल्स वि. दिल्ली कॅपिटल्स, रात्री ८ वा. पासून, जयपूर
  • २९ मार्च - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. कोलकाता नाइट रायडर्स, रात्री ८ वा. पासून, बंगळुरू
  • ३० मार्च - लखनौ सुपर जायंट्स वि. पंजाब किंग्स, रात्री ८ वा. पासून, लखनौ
  • ३१ मार्च - गुजरात टायटन्स वि. सनरायझर्स हैदराबाद, दुपारी ३.३० वा. पासून, अहमदाबाद
  • ३१ मार्च - दिल्ली कॅपिटल्स वि. चेन्नई सुपर किंग्स, रात्री ८ वा. पासून, विशाखापट्टणम
  • १ एप्रिल - मुंबई इंडियन्स वि. राजस्थान रॉयल्स, रात्री ८ वा. पासून, मुंबई
  • २ एप्रिल - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. लखौ सुपर जायंट्स, रात्री ८ वा. पासून, बंगळुरू
  • ३ एप्रिल - दिल्ली कॅपिटल्स वि. कोलकाता नाइट रायडर्स, रात्री ८ वा. पासून, विशाखापट्टणम
  • ४ एप्रिल - गुजरात टायटन्स वि. पंजाब किंग्स, रात्री ८ वा. पासून, अहमदाबाद
  • ५ एप्रिल - राजस्थान रॉयल्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू,रात्री ८ वा. पासून, जयपूर
  • ७ एप्रिल - मुंबई इंडियन्स वि. दिल्ली कॅपिटल्स, दुपारी ३.३० वा.पासून, मुंबई
  • ७ एप्रिल - लखनौ सुपर जायंट्स वि. गुजरात टायटन्स, रात्री ८ वा. पासून, लखनौ
टॅग्स :आयपीएल २०२४ऑफ द फिल्डमुंबई इंडियन्सकोलकाता नाईट रायडर्स