GT, CSK नाहीतर सर्वात 'यशस्वी' संघ पुन्हा एकदा होणार चॅम्पियन; हरभजन सिंगचा दावा

 LSG vs MI : आयपीएलमध्ये आज मुंबई इंडियन्स विरूद्ध लखनौ सुपर जायंट्स असा सामना होत आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2023 02:28 PM2023-05-16T14:28:30+5:302023-05-16T14:29:00+5:30

whatsapp join usJoin us
Mumbai Indians Is A Champion Side, they Can Win Their Sixth IPL Title says former indian all rounder Harbhajan Singh | GT, CSK नाहीतर सर्वात 'यशस्वी' संघ पुन्हा एकदा होणार चॅम्पियन; हरभजन सिंगचा दावा

GT, CSK नाहीतर सर्वात 'यशस्वी' संघ पुन्हा एकदा होणार चॅम्पियन; हरभजन सिंगचा दावा

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

harbhajan singh ipl 2023 : मुंबई : आयपीएलच्या सोळाव्या हंगामात प्लेऑफमध्ये स्थान मिळवणारा गुजरात टायटन्स हा पहिला संघ ठरला आहे. सनरायझर्स हैदराबादचा दारूण पराभव करून हार्दिक पांड्याच्या संघाने ही किमया साधली. गतविजेता गुजरात टायटन्सचा संघ १८ गुणांसह आताच्या घडीला क्रमवारीत अव्वल स्थानावर आहे. मंगळवारी आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात सामना होत आहे. मुंबईचा संघ १४ गुणांसह तिसऱ्या स्थानावर तर १३ गुणांसह लखनौचा संघ चौथ्या स्थानी स्थित आहे. त्यामुळे आजचा सामना दोन्हीही संघांसाठी 'करा किंवा मरा' असाच काहीसा असणार आहे. कारण आज पराभूत होणाऱ्या संघाच्या अडचणीत वाढ होईल, तर विजयी संघ प्लेऑफच्या दिशेने कूच करेल.

दरम्यान, भारतीय संघाचा माजी खेळाडू हरभजन सिंगने आयपीएल २०२३चा चॅम्पियन कोण होईल याबाबत एक मोठा दावा केला आहे. स्टार स्पोर्ट्स क्रिकेट लाईव्हशी बोलताना हरभजनने म्हटले, "मुंबई इंडियन्सने पुन्हा एकदा दाखवून दिले आहे, तो एक चॅम्पियन संघ असून कसे पुनरागमन करायचे हे त्यांना ठाऊक आहे. स्पर्धेच्या सुरूवातीला मुंबईला पराभवाचा सामना करावा लागला होता. पण एकदा त्यांची गाडी विजयाच्या पटरीवर आली अन् आता थांबायचे नाव घेत नाही आहे. त्यामुळे ते पहिल्या दोनमध्ये लीग टप्पा पूर्ण करू शकतात. मुंबईने त्यांचे उरलेले दोन्हीही सामने जिंकले तर त्यांचे १८ गुण होतील. जर १८ गुण झाले आणि गुजरातचे देखील आता १८ गुण आहेत, त्यामुळे मुंबई वगळता कोणता संघ टॉप-२ मध्ये स्थान मिळवू शकत नाही."

तसेच मुंबई इंडियन्सचा संघ त्यांचे उरलेले दोन्ही सामने जिंकून आयपीएलचा किताब देखील पटकावू शकतो असे भज्जीने सांगितले आहे. मुंबईने यंदा देखील आयपीएलचा किताब पटकावल्यास त्यांच्या नावावर सहा ट्रॉफींची नोंद होईल. 

किंग कोहली सहकाऱ्यांसोबत मोहम्मद सिराजच्या नवीन घरी; RCBच्या शिलेदारांनी वेधले लक्ष

आज 'करा किंवा मरा'चा सामना
आज लखनौ आणि मुंबई यांच्यात सामना होत आहे. लखनौच्या संघाने आजचा सामना गमावल्यास यजमान संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर देखील होऊ शकतो. कारण चेन्नईविरूद्धचा सामना रद्द झाल्यामुळे त्यांना एक गुण देण्यात आला होता. आता त्यांचे १५ गुण असून मुंबईचे १६ गुण आहेत. मुंबई इंडियन्सने आपल्या मागील सामन्यात गतविजेत्या गुजरात टायटन्सला पराभवाची धूळ चारली होती. यंदाच्या हंगामात दोन्हीही संघांनी प्रत्येकी १२-१२ सामने खेळले आहेत. रोहितच्या मुंबईला सात तर लखनौला सहा सामने जिंकण्यात यश आले आहे. मुंबई आणि लखनौ हे संघ आतापर्यंत केवळ दोनवेळा आमनेसामने आले आहेत. लक्षणीय बाब म्हणजे दोन्हीही सामन्यांमध्ये लखनौच्या नवाबांनी मुंबईचा पराभव केला आहे. त्यामुळे मुंबईचा संघ मागील पराभवाचा वचपा काढणार का हे पाहण्याजोगे असेल.

'करा किंवा मरा'चा सामना! लखनौच्या नवाबांचे मुंबईसमोर आव्हान; रोहितसेना पराभवाचा बदला घेणार?

 

Web Title: Mumbai Indians Is A Champion Side, they Can Win Their Sixth IPL Title says former indian all rounder Harbhajan Singh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.