मुंबई इंडियन्सच्या वेगवान गोलंदाजावर दोन वर्षांची बंदी; बीसीसीआयला दिला धोका

मुंबई इंडियन्सच्या एका खेळाडूने बीसीसीआयला धोका दिला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2019 18:01 IST2019-06-20T18:00:23+5:302019-06-20T18:01:40+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
Mumbai Indians fast bowlers get banned for two years | मुंबई इंडियन्सच्या वेगवान गोलंदाजावर दोन वर्षांची बंदी; बीसीसीआयला दिला धोका

मुंबई इंडियन्सच्या वेगवान गोलंदाजावर दोन वर्षांची बंदी; बीसीसीआयला दिला धोका

मुंबई : आयपीएल विजेत्या मुंबई इंडियन्सच्या संघाला आज एक मोठा धक्का बसला आहे. कारण मुंबई इंडियन्सच्या एका खेळाडूने बीसीसीआयला धोका दिला आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्सच्या या वेगवान गोलंदाजावर दोन वर्षांची बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

आयपीएलमधील कोणत्याही संघातील खेळायचे असेल तर त्यासाठी बीसीसीआयची परवानगी अनिवार्य असते. बीसीसीआयच्या परवानगीशिवाय कोणताही खेळाडू आयपीएलमध्ये खेळू शकत नाही. आयपीएलमध्ये खेळण्यासाठी प्रत्येक खेळाडूला बीसीसीआयला काही कागदपत्रे द्यावी लागतात. या कागदपत्रांची हमी खेळाडूंची असते. त्याचबरोबर विदेशी खेळाडूंना त्यांच्या क्रिकेट मंडळाचे ना हरकत प्रमाणपत्रही द्यावे लागते.

मुंबई इंडियन्सच्या एका वेगवान गोलंदाजाने आपला जन्माचा दाखला चुकीचा दिल्याचे समजत आहे. या खेळाडूच्या जन्म दाखल्यामध्ये गडबड असल्याचे बीसीसीआयला समजले आहे. त्यामुळे आपल्याशी प्रतारणा करणाऱ्या या खेळाडूवर बीसीसीआयने दोन वर्षांसाठी बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. हा मुंबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाज आहे रसिख सलाम.

रसिख सलाम हा जम्मू आणि काश्मीरचा खेळाडू आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये तीन जम्मू आणि काश्मीरचे खेळाडू खळले होते. रसिख सलामने जन्म दाखल्यामध्ये गडबड केल्यामुळे आता त्याला आयपीएलबरोबर भारताच्या १९ वर्षांखालील संघातही खेळता येणार नाही. हे वृत्त जागरण या वृत्तसंस्थेने दिले आहे.

Web Title: Mumbai Indians fast bowlers get banned for two years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.