Join us

IPL 2022 KKR vs PBKS Live: Mumbai Indians चा माजी खेळाडू Rahul Chahar पंजाबच्या संघात चमकला, मेडन ओव्हर टाकून घेतले दोन बळी

राहुल चहरने सामन्यात एक वेगळाच ट्विस्ट आणला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2022 22:26 IST

Open in App

Rahul Chahar, IPL 2022 KKR vs PBKS Live: पंजाबने कोलकाता विरूद्धच्या सामन्यात २० षटकंही पूर्ण न खेळता केवळ १३७ धावा केल्या. उमेश यादवने २३ धावांत ४ बळी घेत पंजाबच्या डावाला मोठा धक्का दिला. वरच्या फळीत भानुका राजपक्षेने ३१ धावा केल्या होत्या. त्यानंतर कगिसो रबाडाने शेवटच्या टप्प्यात फटकेबाजी करत २५ धावांची भर घातली म्हणून पंजाबने कसाबसा १३० धावांचा टप्पा ओलांडला. त्यानंतर कोलकाताच्या डावातही आधी Mumbai Indiansकडून खेळणाऱ्या राहुल चहरने पंजाब संघातून चमक दाखवली.

१३८ धावांच्या माफक आव्हानाचा पाठलाग करताना कोलकाताच्या डावाची सुरूवातही खराब झाली. अजिंक्य रहाणे आणि वेंकटेश अय्यर स्वस्तात माघारी गेले. या दोघांच्या धक्क्यातून कोलकाता सावरत असतानाच राहुल चहरने एकाच ओव्हरमध्ये कोलकाताला दुहेरी धक्का दिला. राहुल चहरने आपल्या पहिल्याच षटकात आधी श्रेयस अय्यरला आणि नंतर नितिश राणाला माघारी धाडलं. विशेष म्हणजे ही ओव्हरदेखील त्याने निर्धाव म्हणजेच मेडन टाकली.

त्याआधी, कोलकाताचा कर्णधार श्रेयस अय्यर याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. पंजाबचा कर्णधार मयंक अग्रवाल स्वस्तात माघारी परतला. भानुका राजपक्षेने फटकेबाजीची सुरूवात केली पण त्याला मोठी खेळी करता आली नाही. तो बाद झाल्यानंतर पंजाबची फलंदाजी कोलमडली. शिखर धवन (१६), लियम लिव्हिंगस्टोन (१९), राज बावा (११), शाहरूख खान (०) आणि हरप्रीत ब्रार (१४), राहुल चहर (०) हे सर्व फलंदाज झटपट माघारी परतले. रबाडा आणि भानुपक्षेच्या फलंदाजीने पंजाबची लाज राखली.

टॅग्स :आयपीएल २०२२कोलकाता नाईट रायडर्समुंबई इंडियन्सपंजाब किंग्स
Open in App