Fixing? डग आऊटमधून इशारा झाला, अम्पायरने मुंबई इंडियन्सच्या बाजूने निर्णय फिरवला? Video  

मुंबई इंडियन्सचा इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मधील सामना त्यांच्या खेळापेक्षा संशयास्पद निर्णयामुळे चर्चेत येत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2024 03:15 PM2024-04-19T15:15:15+5:302024-04-19T15:17:07+5:30

whatsapp join usJoin us
Mumbai Indians dugout signalled Tim David to take a review, which isn’t allowed by the rules but umpire let it go even Sam Curran asked for it, Video Viral   | Fixing? डग आऊटमधून इशारा झाला, अम्पायरने मुंबई इंडियन्सच्या बाजूने निर्णय फिरवला? Video  

Fixing? डग आऊटमधून इशारा झाला, अम्पायरने मुंबई इंडियन्सच्या बाजूने निर्णय फिरवला? Video  

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

PBKS vs MI match fixed? मुंबई इंडियन्सचा इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मधील सामना त्यांच्या खेळापेक्षा संशयास्पद निर्णयामुळे चर्चेत येत आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध वानखेडेवर झालेल्या सामन्यात टॉस फिक्सिंग प्रकरणानंतर काल पंजाब किंग्सविरुद्धच्या लढतीतून आणखी एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. मुंबई इंडियन्सने रोमहर्षक लढतीत ९ धावांनी पंजाब किंग्सवर विजय मिळवला खरा, परंतु एका धक्कादायक व्हिडीओने आता सोशल मीडियावर अम्पायरची शाळा सुरू झाली आहे. चिटींग होत असल्याचा आरोप पंजाबचा कर्णधार सॅम कुरन याने करूनही अम्पायरने त्याकडे दुर्लक्ष केले आणि निर्णय बदलला.. 


मुंबई इंडियन्सने सूर्यकुमार यादव ( ७८), रोहित शर्मा ( ३६) व तिलक वर्मा ( ३४) यांच्या फटकेबाजीच्या दोरावर ७ बाद १९२ धावांचा डोंगर उभा केला. प्रत्युत्तरात पंजाब किंग्सने १४ धावांत ४ विकेट्स गमावल्या. जसप्रीत बुमराह व गेराल्ड कोएत्झी यांनी सुरुवातीला हे धक्के दिले. त्यानंतर ६ बाद ७७ वरून शशांक सिंग व हरप्रीत भाटीया यांनी पंजाबला सावरण्याचा प्रयत्न केला. शशांक व आशुतोष शर्मा हे पुन्हा एकदा पंजाबचे संकटमोचक बनले. बुमराहने शशांकला ( ४१) माघारी पाठवले, पण आशुतोष व हरप्रीत ब्रार उभे राहिले.

आशुतोषने २८ चेंडूंत २ चौकार व ७ षटकारांसह ६१ धावा चोपल्या, तर हरप्रीतने २१ धावांचे योगदान दिले. 
शेवटच्या काही षटकात पंजाबने विकेट्स गमावल्या आणि सामना हातून निसटला. पंजाबचा संपूर्ण संघ १९.१ षटकांत १८३ धावांवर तंबूत परतला. या सामन्याच्या मुंबई इंडियन्सच्या डावातील १५व्या षटकाचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. यात अम्पायरने नियमांचे उल्लंघन करून मुंबईसाठी DRS घेतल्याचे दिसले.

 


नेमके काय घडले हे जाणून घेऊयात...
१. अर्शदीप सिंगने ऑफ साईडच्या दिशेने सूर्यासाठी चेंडू टाकला
२. तेव्हा अम्पायरने काहीच निर्णय दिला नाही
३. पण, मुंबई इंडियन्सच्या डग आऊटमध्ये प्रशिक्षक मार्क बाऊचर यांनी वाईड असल्याचे सूचित केले
४. त्याने फलंदाज सूर्यकुमार यादवसाठी ही सूचना केली होती, परंतु त्याचे त्याकडे लक्ष नव्हते
५. त्याच्याच बाजूला बसलेल्या टीम डेव्हिडने मग DRS घेण्याची हिंट दिली... मोठ्या स्क्रीनवर हे दिसत असल्याचे कळताच त्याने हात मागे घेतला
६. पंजाब किंग्सचा कर्णधार सॅम कुरन याबाबत अम्पायरकडे तक्रारही केली, तरीही अम्पयारने तिसऱ्या पंचांकडे दाद मागितली
७. मुंबई इंडियन्सने नियमांचे उल्लंघन करून DRS घेतला..


Web Title: Mumbai Indians dugout signalled Tim David to take a review, which isn’t allowed by the rules but umpire let it go even Sam Curran asked for it, Video Viral  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.