Mumbai Indians : मुंबई इंडियन्सने IPL 2023 साठी निवडला नवा मुख्य प्रशिक्षक; विश्वविक्रमी खेळाडूची निवड

Mumbai Indians appoints New Head Coach - मुंबई इंडियन्सने सलग तिसऱ्या दिवशी त्यांच्या चाहत्यांना मोठी बातमी दिली.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2022 11:35 AM2022-09-16T11:35:20+5:302022-09-16T11:35:53+5:30

whatsapp join usJoin us
Mumbai Indians announces the appointment of record-holding wicket-keeper Mark Boucher as their Head Coach starting with IPL 2023 | Mumbai Indians : मुंबई इंडियन्सने IPL 2023 साठी निवडला नवा मुख्य प्रशिक्षक; विश्वविक्रमी खेळाडूची निवड

Mumbai Indians : मुंबई इंडियन्सने IPL 2023 साठी निवडला नवा मुख्य प्रशिक्षक; विश्वविक्रमी खेळाडूची निवड

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Mumbai Indians appoints New Head Coach - मुंबई इंडियन्सने सलग तिसऱ्या दिवशी त्यांच्या चाहत्यांना मोठी बातमी दिली. दोन दिवसांपूर्वी त्यांनी मुख्य प्रशिक्षक माहेला जयवर्धने व झहीर खान यांच्याकडून आयपीएलमधील जबाबदारी काढून घेतली होती, त्यानंतर फ्रँचायझीच्या दक्षिण आफ्रिका ट्वेंटी-२० लीगमधील MI Cape Town संघाच्या कोचिंग स्टाफची घोषणा केली. आज त्यांनी इंडियन प्रीमिअर लीग २०२३ ( IPL 2023) साठी मुंबई इंडियन्सच्या नव्या प्रशिक्षकाचे नाव जाहीर केले. दक्षिण आफ्रिकेकडून विश्वविक्रमाची नोंद करणाऱ्या दिग्गज खेळाडूवर त्यांनी ही जबाबदारी सोपवली आहे.

मुंबई इंडियन्सचा विस्तार वाढला आहे. या फ्रँचायझीने दक्षिण आफ्रिका व युएई येथे होणाऱ्या ट्वेंटी-२० लीगमध्ये संघ खरेदी केला आहे. त्यामुळे माहेला जयवर्धने ( Mahela Jayawardene) व क्रिकेट डेव्हलपमेंट प्रमुख झहीर खान ( Zaheer Khan) यांच्यावर अनुक्रमे Global Head of Performance व  Global Head of Cricket Development ही जबाबदारी सोपवली गेली आहे. त्यात आफ्रिकन लीगमधील MI Cape Town संघासाठी कोचिंग स्टाफची घोषणा केली. ऑस्ट्रेलियन दिग्गज सायमन कॅटिच ( Simon Katich ) यांची मुख्य प्रशिक्षक म्हणून निवड झाली आहे.  दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज फलंदाज हाशिम आमला ( Hashim Amla) हा फलंदाज प्रशिक्षक असणार आहे, तर जेम्स पॅमेंटकडे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक, रॉबिन पीटरसन जनरल मॅनेजर असणार आहे.  


माहेला जयवर्धनेची यशस्वी कामगिरी अन् नवा गडी...
माहेला जयवर्धने याने २०१७मध्ये रिकी पाँटिंगनंतर मुंबई इंडियन्सच्या मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी स्वीकारली. पहिल्याच वर्षी मुंबई इंडियन्सने जेतेपद पटकावले. त्यानंतर २०१९ व २०२० मध्ये जयवर्धनेच्या मार्गदर्शनाखाली मुंबई इंडियन्सने सलग दोन जेतेपद पटकावले. आयपीएलमध्ये जेतेपद कायम राखणारा तो दुसरा संघ ठरला. आता जयवर्धनेकडे मोठी जबाबदारी सोपवल्यानंतर मुंबई इंडियन्सच्या मुख्य प्रशिक्षकपदी दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज मार्क बाऊचर ( Mark Boucher) याची निवड केली गेली आहे.

 
बाऊचरने आगामी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेनंतर दक्षिण आफ्रिकेच्या मुख्य प्रशिक्षकपदी कायम राहणार नसल्याचे नुकतेच जाहीर केले आहे. कसोटी क्रिकेटमध्ये यष्टिंमागे ४०० बळी टीपणारा पहिल्या खेळाडूचा विक्रम बाऊचरने केला आहे. ऑगस्ट २०१६मध्ये बाऊचरकडे स्थानिक संघ टायटन्सच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी सोपवली गेली होती आणि प्रशिक्षणाचा अनुभव नसतानाही त्यांनी दोन वन डे कप व दोन ट्वेंटी-२० चॅलेंज चषक जिंकले. शिवाय सनफॉईल सीरीज ही चार दिवसीय सामन्यांची मालिकाही जिंकली होती.  

Web Title: Mumbai Indians announces the appointment of record-holding wicket-keeper Mark Boucher as their Head Coach starting with IPL 2023

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.