Join us  

मुंबई इंडियन्स आणि आरसीबीमध्ये या तीन खेळाडूंसाठी होणार 'काँटे की टक्कर'

कोलकाता येथे पार पडणाऱ्या या लिलावात एकूण 971 खेळाडू नशीब आजमावणार आहे. यामध्ये 713 भारतीय आणि 258 परदेशी खेळाडूंचा समावेश असलेल्या या लिलाव प्रक्रियेत केवळ 73 खेळाडूंनाच लॉटली लागणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 09, 2019 5:35 PM

Open in App
ठळक मुद्दे या संघांना अर्ज केलेल्या खेळाडूंमधील शॉर्टलिस्टेड खेळाडूंची यादी आज पाच वाजेपर्यंत आयपीएलकडे सोपवायची आहे.

येत्या 19 डिसेंबरला इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल 2020) पुढील मोसमासाठी लिलाव प्रक्रिया पार पडणार आहे. या लिलावाच्यावेळी मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (आरसीबी) यांच्यात तीन खेळाडूंना आपल्या संघात घेण्यासाठी 'काँटे की टक्कर' होणार असल्याचे म्हटले जात आहे.

कोलकाता येथे पार पडणाऱ्या या लिलावात एकूण 971 खेळाडू नशीब आजमावणार आहे. यामध्ये 713 भारतीय आणि 258 परदेशी खेळाडूंचा समावेश असलेल्या या लिलाव प्रक्रियेत केवळ 73 खेळाडूंनाच लॉटली लागणार आहे. आठ संघांमध्ये ही चुरस रंगणार आहे. तत्पूर्वी या संघांना अर्ज केलेल्या खेळाडूंमधील शॉर्टलिस्टेड खेळाडूंची यादी आज पाच वाजेपर्यंत आयपीएलकडे सोपवायची आहे.

तीन खेळाडूंना संघात स्थान देण्यासाठी मुंबई आणि आरसीबी हे प्रयत्नशील असल्याचे समजत आहे. या तीन खेळाडूंमध्ये इंग्लंडचा कर्णधार इऑन मॉर्गन, रॉबिन उथप्पा आणि ख्रिस लीन यांचा समावेश असल्याचे समजत आहे.

IPL 2020: मुंबई इंडियन्सची जोरदार तयारी; RCB अन् DCच्या फलंदाजाला बोलावलं ट्रायलसाठी

गतविजेत्या मुंबई इंडियन्सने या लिलावासाठी चांगलीच तयारी केली आहे. त्यांनी फलंदाज मिलिंद कुमारला ट्रायलसाठी बोलावलं आहे. त्रिपुराच्या या खेळाडूनं सुरुवातीला दिल्ली कॅपिटल्स आणि नंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. 2018-19च्या स्थानिक क्रिकेट मोसमाला सुरुवात होण्यापूर्वी त्यानं त्रिपुराकडून खेळण्याचा निर्णय घेतला. 28 वर्षीय मिलिंदनं 2018-19च्या रणजी मोसमात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम केला. त्यानंतर मागील मोसमात RCBनं त्याला 20 लाख मुळ किमतीत आपल्या ताफ्यात दाखल करून दिले. पण, त्याला दिल्ली कॅपिटल्स प्रमाणे RCB कडूनही खेळण्याची संधी मिळाली नाही.

त्यामुळे आता मुंबई इंडियन्सच्या प्रशिक्षकांना प्रभावित करण्यात यशस्वी ठरल्यास  त्याला आयपीएल पदार्पणाची संधी मिळू शकते. चार जेतेपद नावावर असलेला मुंबई इंडियन्सचा संघ मधल्या फळीतील फलंदाजाच्या शोधात आहे. 28 वर्षीय मिलिंदनं 2011मध्ये दिल्लीकडून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. 2013मध्ये इंग्लंडविरुद्धच्या सराव सामन्यात त्यानं 85 चेंडूंत नाबाद 78 धावांची खेळी केली होती. 2018-09च्या हंगामात त्यानं 121च्या सरासरीनं 1331 धावा चोपल्या आहेत. त्यानं 14 डावांत  सहा शतकं व 4 अर्धशतकं झळकावली आहेत.

आठ संघांचा 'बजेट' चेन्नई सुपर किंग - १४.६ कोटी - ५ खेळाडू ( २ परदेशी)दिल्ली कॅपिटल्स - २७. ८५ कोटी - ११ खेळाडू ( ५ परदेशी) किंग्ज इलेव्हन पंजाब - ४२.७ कोटी - ९ खेळाडू ( ४ परदेशी)कोलकाता नाइट रायडर्स - ३५.६५ कोटी - ११ खेळाडू ( ४ परदेशी)राजस्थान रॉयल्स - २८.९ कोटी- ११ खेळाडू ( ४ परदेशी)मुंबई इंडियन्स- १३.०५ कोटी - ७ खेळाडू ( २ परदेशी)सनरायझर्स हैदराबाद - १७ कोटी - ७ खेळाडू ( २ परदेशी)रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू - २७.९ कोटी - १२ खेळाडू ( ६ परदेशी)

टॅग्स :मुंबई इंडियन्सआयपीएलरॉयल चॅलेंजर्स बेंगलोर