Join us

मुंबई इंडियन्सनेही केली चार्टर्ड विमानांची सोय

दरम्यान, एक विमान पोलार्ड राहत असलेल्या त्रिनिदादसाठी उड्डाण करणार आहे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2021 01:53 IST

Open in App

मुंबई : विदेशी खेळाडूंना सुखरूप घरी पाठविण्यासाठी मुंबई इंडियन्सने देखील चार्टर्ड विमानांची सोय केली आहे. आपल्या संघातील विदेशी खेळाडूंना चार्टर्ड विमानाने पाठवणार आहे. ही विमाने दक्षिण आफ्रिकामार्गे न्यूझीलंड आणि वेस्ट इंडीजसाठी उड्डाण करतील. मुंबई इंडियन्स संघात ट्रेंट बोल्ट, ॲडम मिल्ने, जेम्स निशाम, शेन बॉन्ड या न्यूझीलंडमधील खेळाडूंचा समावेश आहे. विशेष म्हणजे मुंबई इंडियन्सने इतर संघातील विदेशी खेळाडूंनाही सोबत येण्यासाठी निमंत्रण दिलं आहे.

पोलार्डसाठी घरपोच विमानसेवादरम्यान, एक विमान पोलार्ड राहत असलेल्या त्रिनिदादसाठी उड्डाण करणार आहे. हे विमान दक्षिण आफ्रिका मार्गे वेस्ट इंडीजला जाणार आहे. क्विंटन डी कॉक आणि मॅक्रो जेनसनसहित दक्षिण आफ्रिकेचे अनेक खेळाडू मायदेशात पोहोचतील. हे विमान २४ तासांत निघणार आहे.

आरसीबीचे खेळाडू परतलेनवी दिल्ली: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ आपापल्या घराकडे रवाना झाले. विदेशी खेळाडूदेखील चार्टर्र विमानाने गुरुवारी सकाळी आपापल्या ठिकाणाकडे रवाना झाले. कर्णधार विराट कोहली मुंबईत पोहोचला. खेळाडूंना घराकडे सुखरुप रवाना होण्यासाठी बीसीसीआयने पुढाकार घेतला. हे खेळाडू सुरक्षित पोहोचेपर्यंत आम्ही त्यांच्या संपर्कात राहणार आहोत, असे आरसीबीने म्हटले आहे. संघातील ऑस्ट्रेलियाचे खेळाडू मालदिवमध्ये राहणार असून, ऑस्ट्रेलियात प्रवेश मिळताच ते मायदेशात दाखल होतील. द. आफ्रिकेचे खेळाडू दोहामार्गे जोहान्सबर्गला जाणार आहेत. 

 

टॅग्स :मुंबईकोरोना वायरस बातम्याआयपीएल २०२१