मुंबईच्या पोरींची कमाल; वन डेत प्रतिस्पर्धींना १७ धावांत गुंडाळले, सायली सातघरेनं ५ धावांत ७ बळी टिपले

बीसीसीआयनं आयोजित केलेल्या वरिष्ठ महिला वन डे चषक ( Women's Senior ODI Cup) स्पर्धेत मुंबईच्या संघानं बुधवारी कमालच केली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2021 11:13 IST2021-03-17T11:12:27+5:302021-03-17T11:13:15+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
Mumbai chase down 18 runs in just 4 balls against Nagaland in the Women's Senior ODI Cup  | मुंबईच्या पोरींची कमाल; वन डेत प्रतिस्पर्धींना १७ धावांत गुंडाळले, सायली सातघरेनं ५ धावांत ७ बळी टिपले

मुंबईच्या पोरींची कमाल; वन डेत प्रतिस्पर्धींना १७ धावांत गुंडाळले, सायली सातघरेनं ५ धावांत ७ बळी टिपले

बीसीसीआयनं आयोजित केलेल्या वरिष्ठ महिला वन डे चषक ( Women's Senior ODI Cup) स्पर्धेत मुंबईच्या संघानं बुधवारी कमालच केली. ५० षटकांच्या या सामन्यात मुंबईच्या गोलंदाजांनी उल्लेखनीय कामगिरी करताना नागालँड संघाचा डाव १७.४ षटकांत अवघ्या १७ धावांत गुंडाळला. मुंबईनं अवघ्या चार चेंडूंत हे लक्ष्य पार केले. मुंबईच्या सायली सातघरेनं ८.४ षटकांत ४ निर्धाव षटके फेकली आणि ५ धावा देताना ७ विकेट्स घेतल्या. एम दक्षिणी ( २) आणि एस ठाकोर ( १) यांनी तिला चांगली साथ दिली.

प्रथम फलंदाजी करणाऱ्या नागालँडच्या सहा फलंदाजांना भोपळाही फोडता आला नाही. नागालँडच्या सबीरानं सर्वाधिक ९ धावा केल्या. मुंबईच्या पोरींनी ३ अतिरिक्त धावा दिल्या. मुंबईने हे लक्ष्य चार चेंडूत पार केले. इशा ओझानं ४ चेंडूंत ३ चौकारांसह १३ धावा केल्या. वृषाली भगतनं १ चेंडूत षटकार खेचून विजयावर शिक्कामोर्तब केलं.
 

Web Title: Mumbai chase down 18 runs in just 4 balls against Nagaland in the Women's Senior ODI Cup