AB de Villiers: व्हीलचेअरवर बसून एबी डिव्हिलियर्सची जबरदस्त फलंदाजी, पाहा व्हिडीओ

AB de Villiers played wheelchair cricket: मुंबई व्हीलचेअर क्रिकेट संघासोबत एबी डिव्हिलियर्सचा व्हीलचेअरवर बसून क्रिकेट खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2025 14:07 IST2025-05-31T14:03:38+5:302025-05-31T14:07:30+5:30

whatsapp join usJoin us
Mumbai: AB de Villiers played wheelchair cricket at Marine Lines, Video Goes Viral | AB de Villiers: व्हीलचेअरवर बसून एबी डिव्हिलियर्सची जबरदस्त फलंदाजी, पाहा व्हिडीओ

AB de Villiers: व्हीलचेअरवर बसून एबी डिव्हिलियर्सची जबरदस्त फलंदाजी, पाहा व्हिडीओ

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज खेळाडू एबी डिव्हिलियर्समुंबईतील मरीन लाईन्स येथील इस्लाम जिमखाना येथे सराव सत्रादरम्यान मुंबई व्हीलचेअर क्रिकेट संघासोबत क्रिकेट खेळताना दिसला. एबी डिव्हिलियर्स त्यांच्यासोबत खेळण्यासाठी स्वतः व्हीलचेअरवर बसून 
फलंदाजी केली. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. व्हीलचेअर क्रिकेटला पाठिंबा दर्शवल्याबद्दल त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. 

व्हीलचेअर क्रिकेट खेळण्याव्यतिरिक्त, डिव्हिलियर्स मलबार हिलमधील मुंबई महानगरपालिकेच्या महानगरपालिकेच्या शाळेला भेट देणार आहे. हा उपक्रम प्रोजेक्ट मुंबईच्या सतरंग कार्यक्रमाचा एक भाग आहे. या उपक्रमाबद्दल बोलताना डिव्हिलियर्स म्हणाला की, "मुंबईने मला गेल्या काही वर्षांत खूप प्रेम दिले. आज, मी एक क्रिकेटपटू म्हणून नाही तर एक स्वयंसेवक म्हणून त्याची परतफेड करु इच्छितो", असे तो म्हणाला.

आयपीएलची फायनल पाहण्यासाठी उत्सूक
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने आयपीएल २०२५ च्या अंतिम फेरीत प्रवेश केला. यावर बोलताना डिव्हिलियर्सने या वर्षी आरसीबी त्यांचे पहिले विजेतेपद जिंकेल, असा त्याने विश्वास व्यक्त केला. तो म्हणाला की, "आरसीबी अंतिम फेरीत गाठल्याबद्दल त्यांचे मनापासून कौतुक. एलिमिनेटर सामन्यात मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात चांगलीच लढत पाहायला मिळाली. त्यामुळे क्वालिफायर-२ चा सामना चांगला होईल, अशी अपेक्षा आहे.  आयपीएल २०२५ चा अंतिम सामना पाहण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. हे वर्ष आरसीबीसाठी चांगले ठरेल, अशी आशा करतो."

Web Title: Mumbai: AB de Villiers played wheelchair cricket at Marine Lines, Video Goes Viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.