मुल्डर गोलंदाजी करताना घसरला; पाय मुरगळलाय असं वाटत असताना त्यातून सावरत पठ्ठ्यानं मार्शला फसवलं

धडपडला अन् गोलंदाजी करताना जोरात आपटला, नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2025 20:45 IST2025-08-22T20:43:13+5:302025-08-22T20:45:52+5:30

whatsapp join usJoin us
Mulder slipped while bowling; Patthi recovered from what appeared to be a sprained leg and tricked Marsh | मुल्डर गोलंदाजी करताना घसरला; पाय मुरगळलाय असं वाटत असताना त्यातून सावरत पठ्ठ्यानं मार्शला फसवलं

मुल्डर गोलंदाजी करताना घसरला; पाय मुरगळलाय असं वाटत असताना त्यातून सावरत पठ्ठ्यानं मार्शला फसवलं

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

AUS vs SA 2nd ODI Wiaan Mulder Nasty Fall Slipped During His Run Up Video : ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या संघाने दिमाखदार विजय नोंदवत ३ सामन्यांची वनडे मालिका खिशात घातली. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेकडून लुंगी एनिगडी याने गोलंदाजीत तर मॅथ्यू ब्रीट्झके आणि ट्रिस्टन स्टब्सनं फलंदाजीत खास छाप सोडली. या तिघांशिवाय आणखी एका खेळाडूनं अष्टपैलू कामगिरीसह संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. ते नाव म्हणजे वियान मुल्डर. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

धडपडला अन् गोलंदाजी करताना जोरात आपटला, पण...

पहिल्यांदा बॅटिंग करताना २१ धावांचे योगदान दिल्यावर गोलंदाजी वेळी त्याने एक महत्त्वपूर्ण विकेट घेतली. ही विकेट मिळवण्याआधी हा गोलंदाज धडपडला अन् थेट मैदानात कोसळल्याचे पाहायला मिळाले. मैदानात जे घडलं त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नेमकं काय घडलं अन् त्यातून स्वत:ला सावरत त्यानं  विकेटचा डाव कसा साधला  जाणून घेऊयात सविस्तर 

लुंगी एनिगडीचा 'पंजा'; वनडे मालिका खिशात घालत दक्षिण आफ्रिकेनं ऑस्ट्रेलियाचा हिशोब केला चुकता
  
मुल्डरचा पाय मुरगळला असं वाटत असताना तो सावरला अन् मार्शला फसवलं

वियान मुल्डर ऑस्ट्रेलियाच्या डावातील १० व्या षटकात वियान मुल्डर गोलंदाजी करण्यासाठी आला. या षटकातील पहिला चेंडू टाकण्यासाठी त्याने रनअप घेतले अन् क्रीजमध्ये आल्यावर उडी मारताना तो घसरला. वेगाने पळत आल्यावर पाय जमिनीवर ठेवताना स्टेप चुकली अन् तो जोरात आदळला. जलगती गोलंदाजाला अशा परिस्थितीत मोठ्या दुखापतीचा धोका असतो. मुल्डरचा व्हिडिओ जर तुम्ही नीट पाहिला तर त्याचा पाय मुरगळला असणार असेच वाटत होते. पण त्यानंतर त्याने लगेच स्वत:ला सावरलं. यासाठी त्याने केलेली कसरत उपयुक्त ठरली अन् दुखापतीची जोखीम त्याने टाळली. पुन्हा गोलंदाजी मार्कवर जात त्याने एक चेंडू टाकला. ज्यावर कॅमरून ग्रीन याने एक धाव घेतली. पण त्यानंतर लगेच पुढच्या चेंडूवर मिचेल मार्शला त्याने फसवला. मोठा फटका मारण्याच्या नादात ऑस्ट्रेलियन कर्णधार कॉर्बिन बॉशकडे झेल देऊन परतला. ही विकेट मॅचच्या टर्निंग पॉइंटपैकी एक ठरली.

Web Title: Mulder slipped while bowling; Patthi recovered from what appeared to be a sprained leg and tricked Marsh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.