Join us  

IPL 2021, CSK: अनहोनी को होनी कर दे धोनी!, आजच्या निर्णयानं सर्वच बुचकळ्यात, २०१७ नंतर पहिल्यांदाच 'चमत्कार'

IPL 2021, CSK vs RCB, Live: महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni) एक असा कर्णधार आहे की ज्याच्या हटके निर्णयानं सर्वच बुचकळ्यात पडतात.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2021 4:30 PM

Open in App

IPL 2021, CSK vs RCB, Live: महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni) एक असा कर्णधार आहे की ज्याच्या हटके निर्णयानं सर्वच बुचकळ्यात पडतात. भारतीय संघाचा सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून ओळख असलेल्या धोनीनं अनेकदा प्रवाहाच्या विरोधात निर्णय घेतले आहेत आणि ते यशस्वी ठरत असल्याचंही अनेकदा निष्पन्न झालं आहे. सहसा इतर कर्णधार रुळलेले निर्णय घेण्यास जास्त प्राधान्य देतात. पण धोनी निडर होऊन त्याला योग्य वाटतात ते निर्णय घेतो हे आपण याआधीही पाहिलं आहे. (ms dhoni won the toss and elect to bat first at wankhede stadium ipl 2021 csk vs rcb)

IPL 2021: कोहलीचा पराभव नक्की, एमएस धोनीसाठी २५ एप्रिल तारीख आहे लकी!

चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) संघाचा कर्णधार म्हणून धोनीनं अनेकदा प्रवाहाच्या विरोधातले निर्णय घेतले आहेत. चेन्नईनं धोनीच्या नेतृत्वाखाली आयपीएलमध्ये आजवर तीनवेळा विजेतेपद देखील प्राप्त केलं आहे. त्यामुळे आयपीएलमधील यशस्वी कर्णधारांमध्ये धोनीनंही नाव घेतलं जातं. 

IPL 2021: सीएसके आणि आरसीबीसाठी प्रतिस्पर्धी कर्णधार ठरत आहेत डोकेदुखी; बघा आकडेवारी

मुंबईच्या वानखेडे मैदानात आज चेन्नई सुपरकिंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यात सामना सुरू आहे. आजही धोनीनं एक असा निर्णय घेतला की ज्यानं सर्वच आश्चर्यचकीत झाले आहेत. महेंद्रसिंग धोनीनं सामन्याची नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. या निर्णयावर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. कारण वानखेडेचा इतिहास पाहता कोणताही कर्णधार नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतो. वानखेडेच्या मैदानात संध्याकाळी फलंदाजी करणं अधिक सोपं जातं. म्हणून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय सहसा कर्णधार घेत असतात. पण धोनीनं आज अगदी याच्या उलट केलं आहे. धोनीनं आज प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. 2017 नंतर पहिल्यांदाच एका कर्णधारानं वानखेडेवर प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. बहुतेकदा नाणेफेक जिंकणारा संघ वानखेडवर प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतो.

IPL 2021 : 'कोरोना संकटातही IPL सुरू, भारताला माझ्या शुभेच्छा'; अ‍ॅडम गिलख्रिस्टच्या ट्वीटची चर्चा, नेटिझन्सनी दिलं उत्तर

धोनीनं सांगितलं यामागचं कारणधोनीनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय का घेतला यामागचं स्पष्टीकरण देखील समालोचक आयन बिशप यांना दिलं. सामना दुपारी सुरू होत असल्यानं मैदानात खूप उन आहे. त्यामुळे खेळपट्टीवर चेंडू धीम्यागतीनं सहजपणे बॅटवर येऊ शकेल, असं धोनीनं म्हटलं आहे. "मैदानावर पडलेलं ऊन हे एक कारण आहे. खेळपट्टी देखील धीमी होऊ शकते. त्यात आम्ही आमच्या फलंदाजीच्या क्रमवारीतही काही बदल केले आहेत. आज फिरकीपटूंचं मोठं योगदान पाहायला मिळू शकतं. गोलंदाजांना फक्त त्यांच्या लेंथवर बारकाईनं लक्ष देऊन गोलंदाजी करण्याची गरज आहे", असं धोनी म्हणाला. 

कोहली निवडणार होता प्रथम गोलंदाजीधोनीनं नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला असला तरी आरसीबीचा कर्णधार विराट कोहली याला काहीच फारसा फरक पडला नाही. कारण नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचाच निर्णय आम्ही घेणार होतो, कोहलीनं यावेळी म्हटलं. "आम्हाला प्रथम गोलंदाजीच हवी होती. या खेळपट्टीवर आम्ही मागचा सामना खेळलो आहोत. इथं काही दिवस राहिले देखील आहोत. या खेळपट्टीवर सुरुवातीला गोलंदाजांना चांगली साथ मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे आम्ही प्रथम गोलंदाजीचाच निर्णय घेणार होतो", असं कोहलीनं सांगितलं. 

 

टॅग्स :आयपीएल २०२१चेन्नई सुपर किंग्सरॉयल चॅलेंजर्स बेंगलोरमहेंद्रसिंग धोनी