Join us  

धोनी क्रिकेटपासून दोन महिनेच का लांब राहणार, जाणून घ्या...

धोनीने क्रिकेटपासून फक्त दोन महिनेच लांब राहण्याचा निर्णय का घेतला, हा प्रश्न तुम्हाला का पडला नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2019 4:37 PM

Open in App

मुंबई : विश्वचषकानंतर महेंद्रसिंग धोनीने  क्रिकेटपासून दोन महिने लांब राहण्याचा निर्णय घेतला आहे. धोनी या दोन महिन्यांमध्ये भारतीय सैन्याबरोबर सराव करणार आहे. पण धोनीने क्रिकेटपासून फक्त दोन महिनेच लांब राहण्याचा निर्णय का घेतला, हा प्रश्न तुम्हाला का पडला नाही.

भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी विश्वचषकानंतर दोन महिने विश्रांती घेणार असल्याची चर्चा होती. पण धोनी विश्रांती घेणार नसून आपल्या भारतीय आर्मीबरोबर काम करणार असल्याचे म्हटले जात होते. पण धोनी सैन्यात जाऊन नेमके करणार काय, याची उत्सुकता साऱ्यांना असेल. पण आता तर लष्करानं माहीचा प्लान सांगितला आहे.

धोनी लष्कराच्या पॅराशूट रेजिमेंटचा सदस्य असून, त्याच्याकडे लेफ्टनंट कर्नलपद आहे. धोनी लष्करात सेवा बजावणार असल्याची चर्चा आहे. एमएसके प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली बीसीसीआयची निवड समिती आज, रविवारी आगामी वेस्ट इंडिज दौºयासाठी संघ निवड करणार आहे. येत्या ३ ऑगस्टपासून तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेने भारताच्या वेस्ट इंडिज दौºयाला सुरुवात होणार आहे. त्यानंतर भारतीय संघ तीन एकदिवसीय सामने आणि दोन कसोटी सामने खेळणार आहे. ३८ वर्षांच्या धोनीने बीसीसीआयला ही माहिती दिल्यामुळे सध्यातरी तो मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधून निवृत्त होणार नसल्याचे स्पष्ट झाले.

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये तीन मालिका खेळवण्यात येणार आहेत. या मालिका ऑगस्टमध्ये संपणार आहेत. त्यानंतर भारतीय संघ मायदेशात परत येणार आहे. त्यानंतर सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस दक्षिण आफ्रिकेचा संघ भारताच्या दौऱ्यावर येणार आहे. त्यानंतर अनुक्रमे बांगलादेश, वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वे यांच्याबरोबर भारताचे सामने होणार आहेत. त्यामुळे हे सामने खेळण्यासाठी धोनी दोन महिने क्रिकेटपासून लांब राहीला असल्याचे म्हटले जात आहे.

धोनीच्या निवृत्तीबाबत निवड समिती अध्यक्ष काय म्हणाले, वाचा...

वेस्ट इंडिजविरुद्धच्या तीन मालिकांसाठी आज भाताचा संघ जाहीर करण्यात आला. या मालिकेसाठी विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनी यांनी आपण उपलब्ध नसल्याचे सांगितले होते. पण विश्वचषकातील पराभवानंतर विराटचे धाबे दणाणले आणि त्याने या मालिकांमध्ये खेळायचा निर्णय घेतला. पण धोनी मात्र आपल्या निर्णयावर ठाम राहीला. धोनी नसल्यामुळे रीषभ पंतला संघात स्थान देण्यात आले. धोनी लवकरच निवृत्त होणार, अशा चर्चा सध्या सुरु आहेत. याबाबत निवड समिती अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी आज भाष्य केले आहे.

आगामी वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा झाली आहे. तीन  टी-20, तीन वनडे आणि दोन कसोटी सामन्यांसाठीच्या भारतीयसंघाची घोषणा आज निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी केली. विश्वचषकादरम्यान दुखापतीमुळे संघाबाहेर गेलेल्या शिखर धवनचे संघात पुनरागमन झाले आहे. तसेच कसोटी संघामध्ये यष्टीरक्षक वृद्धिमान साहाने पुनरागमन केले आहे. तर विंडीज दौऱ्यातून माघार घेणाऱ्या धोनीला पर्याय म्हणून रीषभ पंतची निवड करण्यात आली आहे.

विंडीज दौऱ्यासाठी भारतीय संघाची निवड करण्यासाठी  एमएसके प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली निवड समितीची बैठक आज मुंबईत झाली. या बैठकीला कर्णधार विराट कोहली हासुद्धा उपस्थित होता.  येत्या ३ ऑगस्टपासून तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेने भारताच्या वेस्ट इंडिज दौऱ्याला सुरुवात होणार आहे. त्यानंतर भारतीय संघ तीन एकदिवसीय सामने आणि दोन कसोटी सामने खेळणार आहे.

धोनीबाबत प्रसाद यांना काही प्रश्न विचारण्यात आले. यानंतर प्रसाद म्हणाले की, " धोनी निवृत्त कधा होणार किंवा अखेरचा सामना कधी खेळणार, हे मी तुम्हाला सांगू शकत नाही. कारण हा निर्णय धोनीचा आहे आणि त्यानेच तो घ्यायचा आहे. पण याबाबत आमच्यामध्ये याबाबत चर्चा झाली आहे. धोनीने क्रिकेटमधील भविष्याबद्दल माझ्याशी चर्चा केली आहे."

टॅग्स :महेंद्रसिंग धोनीभारतीय क्रिकेट संघ