Join us
Daily Top 2Weekly Top 5

बाईक, कार अन् आता ट्रॅक्टर; MS Dhoniचा 'तो' व्हिडीओ होतोय व्हायरल

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याचं बाईक आणि कार प्रेम सर्वांना माहित आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2020 13:14 IST

Open in App

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याचं बाईक आणि कार प्रेम सर्वांना माहित आहे. पण, मंगळवारी चेन्नई सुपर किंग्सनं धोनीचा एक व्हिडीओ शेअर केला. त्यात तो चक्क ट्रॅक्टर चालवताना दिसत आहे. लॉकडाऊनमध्ये धोनी आणि मुलगी झिवा यांचे अनेक व्हिडीओ चेन्नई सुपर किंग्सने पोस्ट केले आहे. धोनी सध्या कुटुंबीयांसोबत रांची येथील फार्महाऊसवर आहे.  

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी जुलै 2019पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. त्यामुळे त्याच्या निवृत्तीच्या चर्चा रंगल्या होत्या. धोनीच्या भविष्याच्या वाटचालीबद्दल अजूनही स्पष्टता नाही. वर्ल्ड कप स्पर्धेनंतर तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूरच आहे. इंडियन प्रीमिअर लीगमधून ( आयपीएल) धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करेल, असे वाटले होते. पण, कोरोना व्हायरसमुळे आयपीएलवरही अनिश्चिततेचं सावट आहे.  

धोनीनं 90 कसोटी सामन्यांत 38.09 च्या सरासरीनं 6 शतकं व 33 अर्धशतकांसह 4876 धावा केल्या आहेत. 350 वन डे क्रिकेटमध्ये त्याची सरासरी ही 50.57 इतकी आहे. त्याच्या 10773 धावांत 10 शतकं व 73 अर्धशतकांचा समावेश आहे. ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये त्यानं 98 सामन्यांत 1617 धावा केल्या आहेत. यष्टिरक्षणात कसोटीत त्याच्या नावावर 256 झेल व 38 स्टम्पिंग, वन डेत 321 झेल व 123 स्टम्पिंग आणि ट्वेंटी-20त 57 झेल व 34 स्टम्पिंग आहेत. 

पाहा व्हिडीओ... 

मागील आठवड्यात  सोशल मीडियावर #DhoniRetires हे ट्रेंड व्हायरल झाला होता. धोनीच्या पत्नीनं त्याला सडेतोड उत्तर दिले होते. 

निर्दयी मनुष्य; गर्भवती हत्तीची निर्घृण हत्या; भुकेनं व्याकुळ भटकत होती

17 वर्षीय नसीम शाह टीम इंडियाच्या विराट कोहलीला सहज बाद करेल; पाकिस्तानी क्रिकेटपटूचा दावा

वाईट बातमी: नऊ वेळा विश्वविजेतेपद पटकावणाऱ्या खेळाडूनं घेतला अखेरचा श्वास

'त्या' प्रसंगामुळे प्रचंड वेदना झाल्या होत्या; हार्दिक पांड्यानं व्यक्त केली खंत

टॅग्स :महेंद्रसिंग धोनीचेन्नई सुपर किंग्स