Join us  

संघात नसूनही धोनीच्या शिरपेचात खोवला मानाचा तुरा; जगभरात भारताचे नाव उंचावले

धोनीने केलेल्या पराक्रमामुळे भारताचे नाव जगभरात उंचावले गेले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2019 5:29 PM

Open in App

मुंबई : भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी हा भारताच्या संघात नाही. इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वचषकानंतर धोनी भारतासाठी एकही सामना खेळलेला नाही. पण तरीही धोनीच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. धोनीने केलेल्या पराक्रमामुळे भारताचे नाव जगभरात उंचावले गेले आहे.

धोनीला पर्याय म्हणून रिषभ पंतला संघात स्थान देण्यात आले आहे. त्याचबरोबर ट्वेन्टी-२० विश्वचषक डोळ्यापुढे ठेवून धोनीला संघात स्थान देण्यात आलेले नाही. पंतलाच ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या दृष्टीने सर्वात जास्त संधी दिली जात आहे. पण बऱ्याच संधी देऊनही पंत हा सातत्याने अपयशी ठरताना दिसत आहे.

काही दिवसांमध्ये २०१९ हे वर्ष संपत आहे. त्यामुळे गेल्या वर्षभरात किंवा गेल्या दहा वर्षांमध्ये कोणते खेळाडू सर्वोत्तम ठरले, याची यादी बनवली जात आहे. गेल्या दहा वर्षांमध्ये सर्वाधिक बळी मिळवण्याचा पराक्रम भारताचा फिरकीपटू आर. अश्विनच्या नावावर जमा झाला आहे. त्याचबरोबर गेल्या दहा वर्षांमध्ये यष्ट्यांमागे सर्वाधिक बळी मिळवण्याचा पराक्रम धोनीच्या नावावर जमा झाला आहे.

धोनीने २०१० ते २०१९ या दहा वर्षांमध्ये सर्वाधिक २४२ बळी टिपल्याची किमया साधली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये या दहा वर्षांत सर्वात जास्त बळी मिळवणारा यष्टीरक्षक धोनी ठरला आहे. धोनीपूर्वी हा विक्रम ऑस्ट्रेलियाचा माी यष्टीरक्षक अॅडम गिलख्रिस्टच्या नावावर होता. २००० ते २००९ या दहा वर्षांमध्ये गिलख्रिस्टने ३६२ बळी मिळवले होते.

पाकिस्तानचा संघ मैदानात नमाज पडू शकतो, तर धोनी आर्मीचा लोगो ग्लोव्हजवर का वापरू शकत नाही; नेटकरी खवळलेसध्याच्या घडीला पाकिस्तानी संघातील हिंदू क्रिकेटपटूंना नमाज पडण्यावर सक्ती असल्याचा मुद्दा चांगलाच गाजतो आहे. पण पाकिस्तानचा संघ मैदानात नमाज पडू शकतो, तर भारताचा माडी कर्णधार महेंद्रसिं धोनी आर्मीचा लोगो ग्लोव्हजवर का वापरू शकत नाही, असा सवाल आता नेटकऱ्यांनी विचारला आहे.

धोनीने काही महिन्यांपूर्वी आर्मीचा लोगो ग्लोव्हजवर लावला होता. धोनी हा भारतीय आर्मीचा एक सदस्य आहे. त्याला मानद पदही देण्यात आलेले आहे. त्याचबरोबर इंग्लंडमधील विश्वचषकानंतर तो आर्मीबरोबर जम्मू आणि काश्मीरमध्ये सराव करण्यासही गेला होता.

जेव्हा धोनीने आपल्या ग्लोव्हजवर लोगो लागल्याचे वायरल झाले, तेव्हा त्याला हा लोगो काढण्यास सांगितले गेले. धोनीनेही हा लोगो आपल्या ग्लोव्हजमधून काढला होता. पण जर पाकिस्तानचा संघ मैदानात नमाज पडत असेल, तर धोनीने लोगो वापरण्यात गैर काय आहे, असा सवाल आता नेटकरी विचारू लागले आहेत. 

टॅग्स :महेंद्रसिंग धोनीभारत