ठळक मुद्देहा व्हीडीओ एका विमानतळाबाहेरचा असल्याचे दिसत आहे. या व्हीडीओमध्ये धोनी आपल्या गाडीमध्ये ड्राइव्हिंग सीटवर बसला आहे.या गोष्टीचा एक व्हीडीओही वायरल झाला आहे.
मुंबई : भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी ट्वेन्टी-20 संघात नसला तरी तो चर्चेचा विषय ठरत आहे. काही दिवसांपूर्वी धोनी कबड्डीच्या मैदानातही पाहायला मिळाला होता. आता एक प्रोटोकॉल मोडल्याबद्दल धोनी चर्चेत आल्याचे म्हटले जात आहे. या गोष्टीचा एक व्हीडीओही वायरल झाला आहे.
हा व्हीडीओ एका विमानतळाबाहेरचा असल्याचे दिसत आहे. या व्हीडीओमध्ये धोनी आपल्या गाडीमध्ये ड्राइव्हिंग सीटवर बसला आहे. यावेळी एक लहान मुलगी त्याला भेटायला येते. धोनी यावेळी तिच्याशी बोलतो आणि तिच्याबरोबर हात मिळवतो. धोनी आपल्या लहानग्या चाहत्यांनाही चांगली वागणूक देतो, असे या व्हीडीओमधून दिसत आहे. तर काहींच्या मते धोनीने विमानतळावर गाडी थांबवून असे बोलणे प्रोटोकॉलमध्ये बसत नसल्याचेही म्हटले आहे.
हा पाहा व्हीडीओ