Join us

"तू एकदा पाकिस्तानात जा आणि तिथे... "; धोनीचा चाहत्याला सल्ला, नक्की कारण काय?

धोनीच्या अजब सल्ल्यावर चाहता काय म्हणाला, वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2023 18:27 IST

Open in App

MS Dhoni Fan Pakistan: भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचे चाहते सर्वत्र आहेत. अर्थात धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे पण तरीही तो आयपीएल खेळतो आणि त्याची क्रेझ दरवर्षी आयपीएलमध्ये पाहायला मिळते. धोनीने त्याच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जला पाच वेळा विजेतेपद मिळवून दिले आहे. धोनी अनेक युवा क्रिकेटपटूंना भेटतो आणि त्यांना सल्ले देतो. खेळाडूही त्याचा सल्ला ऐकतात. परंतु अलीकडेच धोनीचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो एका व्यक्तीला सल्ला देत आहे, परंतु या व्यक्तीने धोनीचा सल्ला मानण्यास स्पष्टपणे नकार दिला आहे.

सध्या धोनीचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो एका रेस्टॉरंटमध्ये दिसत आहे. तो एका काउंटरवर उभा आहे आणि तिथे एका फॅनशी बोलत आहे. दोघांमध्ये जेवणाबाबत चर्चा होते. यादरम्यान, धोनी त्या व्यक्तीला सांगतो की, तू एकदा पाकिस्तानात जा, तिथलं जेवण खूप छान आहे. तो व्यक्ती मात्र धोनीचा सल्ला ऐकण्यास स्पष्ट नकार देतो. तो माणूस म्हणतो की, मी पाकिस्तानात जाणार नाही. तुम्ही चांगल्या जेवणाबाबत सल्ला दिलात तरीही मी पाकिस्तानात जाणार नाही. मी खवय्या आहे, पण छान जेवायला मिळतं म्हणून मी चुकूनही पाकिस्तानात जाणार नाही.

धोनीचा हा किस्सा सध्या भरपूर चर्चेत आहे. हा किस्सा ऐकून आणि वाचून अनेक चाहत्यांनी रिप्लाय दिले आहेत. सोशल मीडियावर अनेक जण यावर विविध प्रतिक्रिया देताना दिसत आहेत.

टॅग्स :महेंद्रसिंग धोनीपाकिस्तानअन्न