Join us

'धोनीने ट्वेन्टी-20 विश्वचषक खेळून निवृत्त व्हावं' जाणून घ्या, सांगतंय कोण...

आता त्याच्या एका जवळच्या व्यक्तीनेच, धोनीने ट्वेन्टी-20 विश्वचषकानंतर निवृत्त व्हावे, असे म्हटले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2019 17:48 IST

Open in App

नवी दिल्ली : विश्वचषकात भारताला उपांत्य फेरीत पराभूत व्हावे लागले. या सामन्यानंतर धोनी आपली निवृत्ती जहीर करेल, असे बऱ्याच जणांना वाटले होते. पण ही गोष्ट पाहायला मिळालेली नाही. पण आता त्याच्या एका जवळच्या व्यक्तीनेच, धोनीने ट्वेन्टी-20 विश्वचषकानंतर निवृत्त व्हावे, असे म्हटले आहे.

धोनीने क्रिकेटचे धडे गिरवले ते केशव बॅनर्जी यांच्याकडून. त्यामुळे धोनीला सर्वात जास्त जवळून बॅनर्जी ओळखतात. धोनीच्या निवृत्तीच्या चर्चेबाबत विचारले असता बॅनर्जी म्हणाले की, " ट्वेन्टी-20 आणि एकदिवसीय क्रिकेट यांच्यामध्ये भरपूर फरक आहे. या दोन्ही क्रिकेटचा विचार करता ट्वेन्टी-20 क्रिकेटमध्ये कमी कालावधी लागतो आणि उर्जाही कमी लागते. त्यामुळे धोनीने आता ट्वेन्टी-20 क्रिकेटवर लक्ष केंद्रीत करायला हवे."

ते पुढे म्हणाले की, " धोनी हा यष्टीरक्षक फलंदाज आहे. त्यामुळे फलंदाजी आणि यष्टीरक्षण या दोन्ही गोष्टी त्याला कराव्याच लागतात. या दोन्ही गोष्टींमध्ये सर्वाधिक उर्जा लागते. त्यामुळे धोनीने एकदिवसीय क्रिकेटपेक्षा आता ट्वेन्टी-20 क्रिकेटचा विचार करायला हवा."

धोनीच्या निवृत्तीबाबत बॅनर्जी म्हणाले की, " धोनीचा फिटनेस पाहता त्याला ट्वेन्टी-20 क्रिकेटला चांगला न्याय देता येईल. आगामी विश्वचषक हा ऑस्ट्रेलियामध्ये खेळवण्यात येणार आहे. ऑस्ट्रेलियात होणाऱ्या ट्वेन्टी-20 विश्वचषक धोनीने खेळावा आणि त्यानंतर निवृत्तीबाबत विचार करावा." 

टॅग्स :महेंद्रसिंग धोनी