Join us  

आता धोनीचं 'मिशन काश्मीर'; जम्मू-काश्मीरमधील मुलांसाठी उचलणार मोठं पाऊल!

भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी जम्मू-काश्मीर खोऱ्यात सध्या भारतीय सैनिकांसोबत पहारा देत आहे. कॅप्टन कूल धोनीचं सैन्यप्रेम हे लपलेलं नाही आणि म्हणूनच त्यानं वेस्ट इंडिज दौऱ्यातून विश्रांती घेत सीमेवर पहारा देण्याचा निर्णय घेतला.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2019 11:23 AM

Open in App

जम्मू-काश्मीर : भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीजम्मू-काश्मीर खोऱ्यात सध्या भारतीय सैनिकांसोबत पहारा देत आहे. कॅप्टन कूल धोनीचं सैन्यप्रेम हे लपलेलं नाही आणि म्हणूनच त्यानं वेस्ट इंडिज दौऱ्यातून विश्रांती घेत सीमेवर पहारा देण्याचा निर्णय घेतला. 31 जुलै ते 15 ऑगस्ट या कालावधीत तो भारतीय सैन्याच्या 106 TA बटालियन ( पॅरा) सोबत दक्षिण काश्मीरमध्ये पहारा देत आहे. पण, त्यानंतरही त्याच्या मनात काहीतरी वेगळं करण्याचा विचार सुरू आहे. जम्मू-काश्मीर खोऱ्यातील युवा पिढीसाठी काही तरी करण्याचा विचार त्याच्या मनात घोंगावत आहे. धोनीच्या मनात काय आहे, चला जाणून घेऊया...

महेंद्रसिंग धोनीच्या घरी नवी पाहुणी; साक्षी म्हणाली missing you माही!

Social Viral : असा कॅप्टन कूल धोनी कधी पाहिला नसाल; 'या' फोटोनं जिंकलीत मनं!

2011 मध्ये भारतीय क्रिकेट संघाने वर्ल्ड कप जिंकल्यानंतर त्याला लष्करातील हे मानद लष्करात लेफ्ट. कर्नलपद बहाल करण्यात आले होते. हा हुद्दा मिळाल्यानंतर 2015 मध्ये धोनीने आग्रा येथील प्रशिक्षण कॅम्पमध्ये लष्करी विमानांमधून ‘पॅराट्रुपर’ म्हणून प्रशिक्षण पूर्ण केले होते. त्यानंतर 2019च्या वर्ल्ड कप स्पर्धेनंतर त्यानं सैन्यसेवा करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्याने वेस्ट इंडिज दौऱ्यातून विश्रांती मिळावी, अशी विनंती बीसीसीआयकडे केली. बीसीसीआयनेही ती मान्य केली आणि सध्या धोनी सैनिकांसोबत देशातील जनतेसाठी सीमेवर पहारा देत आहे. 

Video : महेंद्रसिंग धोनीनं जवानांसोबत खेळला 'व्हॉलीबॉल'चा डाव

धोनीला येथे दिवस आणि रात्र अशा शिफ्टमध्ये काम करावे लागत आहे. यावेळी धोनीकडे पाच किलो वजनाच्या 3 मॅग्जीन, 3 किलोचे पोशाख, 2 किलोची बूटं, 4 किलोचे 3 ते 6 ग्रेनेड, 1 किलोचे हॅल्मेट आणि 4 किलोचे बुलेटप्रुफ जॅकेट असे एकूण 19 किलो वजन असणार आहे. धोनी यावेळी 50-60 सैनिकांसोबत बंकरमध्ये राहत आहे. 

महेंद्रसिंग धोनी येत्या 15 ऑगस्टला लडाखमधील लेह येथे झेंडावंदन करण्याची शक्यता असल्याचे समजते. तसेच धोनी भारतीय सेनेचा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर असून युनिटमधील सदस्यांना तो प्रेरित करतो असे भारतीय सेनेच्या अधिकाऱ्याने स्पष्ट केले. आता धोनीनं जम्मू-काश्मीर येथील युवकांना क्रिकेट शिकता यावं, यासाठी क्रिकेट अकादमी स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार धोनीनं यासंदर्भात क्रीडा मंत्रालयाशी प्राथमिक चर्चा केली आहे.   

टॅग्स :महेंद्रसिंग धोनीजम्मू-काश्मीरभारतीय जवान