Video : महेंद्रसिंग धोनीनं जवानांसोबत खेळला 'व्हॉलीबॉल'चा डाव

भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी दोन महिने क्रिकेटपासून दूर राहणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2019 10:14 AM2019-08-05T10:14:33+5:302019-08-05T10:14:48+5:30

whatsapp join usJoin us
Viedo : Lt Col. MS Dhoni spotted playing volleyball with his Para Territorial Battalion | Video : महेंद्रसिंग धोनीनं जवानांसोबत खेळला 'व्हॉलीबॉल'चा डाव

Video : महेंद्रसिंग धोनीनं जवानांसोबत खेळला 'व्हॉलीबॉल'चा डाव

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

जम्मू-काश्मीर : भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी दोन महिने क्रिकेटपासून दूर राहणार आहे. या कालावधीत तो पंधरा दिवस भारतीय सैनिकांसोबत काश्मीर खोऱ्यात पहारा देण्याचं काम करणार आहे. 31 जुलैला धोनी काश्मीर खोऱ्यातील 106TA बटालियन (पॅरा) सोबत रूजू झाला. 15 ऑगस्ट पर्यंत तो येथेच राहणार आहे. भारतीय सैन्याची सेवा करता यावी यासाठी धोनीनं वेस्ट इंडिज दौऱ्यातून विश्रांती घेतली आहे.

धोनी ज्या बटालियनमध्ये सहभागी होऊन पहारा देणार आहे, ती बटालियन विशेष सैनिकांची आहे. यात देशातील प्रत्येक विभागातून आलेले सैनिक आहेत. धोनीला येथे दिवस आणि रात्र अशा शिफ्टमध्ये काम करावे लागणार आहे. यावेळी धोनीकडे पाच किलो वजनाच्या 3 मॅग्जीन, 3 किलोचे पोशाख, 2 किलोची बूटं, 4 किलोचे 3 ते 6 ग्रेनेड, 1 किलोचे हॅल्मेट आणि 4 किलोचे बुलेटप्रुफ जॅकेट असे एकूण 19 किलो वजन असणार आहे. धोनी यावेळी 50-60 सैनिकांसोबत बंकरमध्ये राहणार आहे. 38 वर्षीय धोनी लष्कराच्या पॅराशूट रेजिमेंटचा सदस्य असून, त्याच्याकडे लेफ्टनंट कर्नलपद आहे. 2011साली भारतीय लष्करानं त्याला हा मान दिला. 2015मध्ये त्यानं पॅराट्रुपरची परीक्षाही पास केली.

सैनिकांसोबतचा धोनीचा एक नवा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात धोनी सैनिकांसोबत व्हॉलीबॉल खेळताना दिसत आहे.
पाहा व्हिडीओ..


याआधी रविवारी धोनीचा असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यात सैन्याच्या वेशात असलेला धोनी बॉलिवूडचं गाण गाताना दिसत आहे.

 

Web Title: Viedo : Lt Col. MS Dhoni spotted playing volleyball with his Para Territorial Battalion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.