Join us
Daily Top 2Weekly Top 5

भारताच्या संघातून धोनी बाहेरच; संधी मिळणार की थेट निवृत्तीची घोषणा?

निवड समितीने मात्र धोनीला यावेळी संधी दिलेली नाही.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2019 20:30 IST

Open in App

कोलकाता : वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे आणि ट्वेन्टी-२० संघांची घोषणा आज करण्यात आली. या मालिकांमध्ये भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी पुनरागमन करणार असल्याची चर्चा होती. पण या संघात धोनीला स्थान मात्र देण्यात आलेले नाही. त्यामुळे यापुढे धोनीला संधी मिळणार की थेट निवृत्ती घ्यावी लागणार, अशा चर्चांना उत आला आहे.

इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वचषकानंतर धोनीने एकही सामना खेळलेला नाही. त्यामुळे वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे मालिकेमध्ये धोनीला आता संधी देण्यात येणार, असे म्हटले जात होते. पण निवड समितीने मात्र धोनीला यावेळी संधी दिलेली नाही.

 वेस्ट इंडिजविरुद्धच्या ट्वेन्टी-२० आणि एकदिवसीय मालिकांसाठी भारताचे संघ आज जाहीर करण्यात आले आहेत. या संघात भारताचा गोलंदाज भुवनेश्वर कुमारचे कमबॅक झाले आहे. पण महेंद्रसिंग धोनी आणि मयांक अगरवाल यांना या संघात स्थान मिळेल, अशी चर्चा होती. पण ही चर्चा अखेर फोल ठरल्याचे पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर महाराष्ट्राच्या केदार जाधवचे या संघात पुनरागमन झाल्याचेही पाहायला मिळत आहे.

कोलकाता येथे निवड समिती, बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली आणि भारताचा कर्णधार विराट कोहली यांच्यामध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकांच्या संघ निवडीबाबत चर्चा झाली. या चर्चेमध्ये भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री दिसत नव्हते.बांगलादेश मालिकेनंतर वेस्ट इंडिजचा संघ भारतात तीन वन डे आणि तीन ट्वेंटी-20 मालिका खेळण्यासाठी येणार आहे. या दौऱ्याला 6 डिसेंबर पासून ट्वेंटी-20 सामन्यानं सुरुवात होणार आहे. पहिला ट्वेंटी-20 सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. पण, मुंबई पोलिसांनी या सामन्याला सुरक्षा पुरवण्यास अडचण होईल, असे सांगितले आहे. 6 डिसेंबर हा महापरिनिर्वाण दिवस आहे आणि त्यामुळे मुंबईतील बहुतेक पोलीस त्या ड्युटीवर असणार आहे. त्यामुळे क्रिकेट सामन्याला सुरक्षा पुरवण्या इतके पोलीस मुंबई पोलिसांकडे उपलब्ध नसल्याचे बोलले जात आहे.

विंडीज मालिकेचे वेळापत्रकट्वेंटी-20 मालिका6 डिसेंबर - मुंबई8 डिसेंबर - तिरुवनंतपुरम11 डिसेंबर - हैदराबादवन डे मालिका15 डिसेंबर- चेन्नई18 डिसेंबर- विशाखापट्टणम22 डिसेंबर - कट्टक 

टॅग्स :महेंद्रसिंग धोनी