MS धोनीने जर्सी नंबर ७ सोडला! IPL २०२६ पूर्वी 'माही'ने का निवडली ८ नंबरची जर्सी? चाहत्यांना मोठा धक्का... 

MS Dhoni Jersey Number Changed: धोनीने सोशल मीडियावर जर्सी नंबर बदलल्याचे जाहीर केले आहे. जडेजाचे कनेक्शन की मार्केटिंग स्टंट? वाचा सविस्तर.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2026 09:44 IST2026-03-18T09:43:07+5:302026-03-18T09:44:52+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
MS Dhoni Jersey number Changed: Dhoni gave up jersey number 7! Why did 'Mahi' choose jersey number 8 before IPL 2026? Big shock to fans... | MS धोनीने जर्सी नंबर ७ सोडला! IPL २०२६ पूर्वी 'माही'ने का निवडली ८ नंबरची जर्सी? चाहत्यांना मोठा धक्का... 

MS धोनीने जर्सी नंबर ७ सोडला! IPL २०२६ पूर्वी 'माही'ने का निवडली ८ नंबरची जर्सी? चाहत्यांना मोठा धक्का... 

MS Dhoni New Jersey Number:आयपीएल २०२६ सुरू होण्यापूर्वी क्रिकेट विश्वात एकाच नावाची चर्चा आहे, ती म्हणजे महेंद्रसिंग धोनी. गेल्या दोन दशकांपासून 'नंबर ७' ही ओळख असलेल्या धोनीने अचानक आपला जर्सी नंबर बदलून '८' केल्याचे संकेत दिले आहेत. धोनीने स्वतः सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत, "७ नंबर नेहमीच माझ्या जवळ राहिला आहे, पण आज मी ८ नंबरवर स्विच करत आहे," असे म्हटल्याने चाहत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

धोनीने ७ सोडून ८ नंबर का निवडला, यावर सोशल मीडियावर अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. काही रिपोर्ट्सनुसार, चेन्नई सुपर किंग्सचा स्टार ऑलराऊंडर रवींद्र जडेजा राजस्थान रॉयल्समध्ये ट्रेड झाल्यानंतर, धोनीने त्याच्या सन्मानार्थ हा निर्णय घेतला असावा अशी चर्चा आहे.


बॅटिंग पोझिशनचा संकेत
गेल्या हंगामात धोनी अनेकदा ८ व्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता. एबी डिव्हिलियर्स आणि चेतेश्वर पुजारा सारख्या दिग्गजांनी धोनीने वरच्या क्रमांकावर खेळावे, अशी मागणी केली असली तरी, '८' नंबर हा त्याच्या फलंदाजीच्या क्रमांकाचा संकेत असू शकतो, असेही मानले जात आहे.

मार्केटिंग स्टंट
अनेक तज्ज्ञांच्या मते, हा कोणत्याही मोठ्या ब्रँडच्या प्रमोशनचा किंवा जाहिरातीचा भाग असू शकतो, कारण व्हिडिओमध्ये धोनीने पिवळ्या ऐवजी निळ्या रंगाची जर्सी घातली आहे.

'नंबर ७' आधीच निवृत्त
बीसीसीआयने २०२३ मध्येच धोनीच्या सन्मानार्थ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून ७ नंबरची जर्सी निवृत्त केली आहे. मात्र, आयपीएलमध्ये धोनी हाच नंबर वापरत होता. आता ८ नंबरच्या निवडीमागील अधिकृत कारण लवकरच स्पष्ट होईल, असे धोनीने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

Web Title : धोनी ने जर्सी नंबर 7 छोड़ा! क्या IPL 2026 से पहले चुना 8?

Web Summary : एमएस धोनी ने आईपीएल 2026 से पहले जर्सी नंबर 7 से 8 बदलकर अटकलों को जन्म दिया। कारण रवींद्र जडेजा के सम्मान से लेकर बैटिंग पोजीशन, मार्केटिंग स्टंट या नंबर 7 की रिटायरमेंट तक हैं।

Web Title : Dhoni Abandons Jersey Number 7! Chooses 8 Before IPL 2026?

Web Summary : MS Dhoni sparks speculation by switching his jersey number from 7 to 8 before IPL 2026. Reasons range from honoring Ravindra Jadeja's trade to hinting at his batting position, a marketing stunt, or retirement of number 7 jersey.