Join us
Daily Top 2Weekly Top 5

इम्पॅक्ट प्लेयर, मेटॉर की..., चेन्नईच्या संघात काय असेल धोनीची भूमिका, संजूच्या आगमनाने बदललं समीकरण  

MS Dhoni In IPL 2026: इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएलच्या अठराव्या हंगामाचं बिगुल वाजण्यासाठी आता केवळ आठवडा उरला आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये क्रिकेटप्रेमींचं अनेक युवा आणि उदयोन्मुख खेळाडूंसोबतच चेन्नई सुपरकिंग्सचा ज्येष्ठ फलंदाज महेंद्रसिंग धोनीकडेही विशेष लक्ष असणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2026 16:52 IST

Open in App

इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएलच्या अठराव्या हंगामाचं बिगुल वाजण्यासाठी आता केवळ आठवडा उरला आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये क्रिकेटप्रेमींचं अनेक युवा आणि उदयोन्मुख खेळाडूंसोबतच चेन्नई सुपरकिंग्सचा ज्येष्ठ फलंदाज महेंद्रसिंग धोनीकडेही विशेष लक्ष असणार आहे. वयाच्या ४४ व्या वर्षी पुन्हा एकदा आपलं कौशल्य दाखवण्यासाठी सज्ज झालेल्या महेंद्रसिंग धोनीसाठी यंदाचा हंगाम आयपीएलमधील शेवटचा हंगाम ठरू शकतो, असा अंदाज क्रिकेट समीक्षकांकडून वर्तवला जात आहे. त्यातच महेंद्रसिंग धोनी यंदाच्या आयपीएलमध्ये चेन्नई सुपरकिंग्सकडून खेळताना कोणत्या भूमिकेत दिसणार आहे, याबाबतही धोनी आणि चेन्नईच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता दिसून येत आहे.

यंदाच्या आयपीएलमध्ये चेन्नई सुपरकिंग्सचा संघ ३० मार्च रोजी राजस्थान रॉयल्सविरुद्ध होणाऱ्या सलामीच्या लढीमधून स्पर्धेतील आपल्या अभियानाची सुरुवात करणार आहे. त्यातच यंदाची आयपीएल ही धोनीची खेळाडू म्हणून शेवटची आयपीएल असल्याचे बोलले जात असल्याने चाहत्यांचं धोनीकडे विशेष लक्ष असणार आहे. पण चाहत्यांना आश्चर्याचे धक्के देण्यात वाकबगार असलेला धोनी पुढच्या हंगामामध्ये खेळतानाही दिसू शकतो.

धोनीने चेन्नईच्या संघाकडून खेळत राहावे, असे त्याच्या चाहत्यांना वाटू शकते. मात्र संजू सॅमसन याचं आता चेन्नई सुपरकिंग्सच्या संघात आगमन झालं आहे. तसेच सॅमसन हा सुद्धा यष्टीरक्षक आहे. एवढंच नाही तर उर्विल पटेलच्या रूपात चेन्नईकडे तिसऱ्या यष्टीरक्षकाचा पर्यायही आहे. अशा परिस्थिती महेंद्रसिंग धोनीला संघात स्थान मिळणार का? तसेच संघात स्थान मिळाल्यास तो कोणत्या क्रमांकावर फलंदाजी करणार? यंदा धोनी इम्पॅक्ट प्लेयर म्हणून खेळणार का? की एक सामान्य खेळाडू म्हणून खेळणार, धोनीला संघात घ्यायचं असल्यास चेन्नईचा संघ कसा असेल, असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

लक्ष देण्यासारखी बाब म्हणजे आयपीएलमध्ये चेन्नई सुपरकिंग्सचा संघ हा त्याच्या चाहत्यांमुळे खूप लोकप्रिय आहे. तसेच चेन्नईचे चाहते अधिक असण्यामागे ब्रँड धोनी हे एक कारण आहे. जेव्हा धोनी मैदानावर खेळण्यासाठी येतो तेव्हा चाहत्यांचा उत्साह शिगेला पोहोचतो, हे दिसून आलेले आहेत. गेल्या काही हंगामांमध्ये धोनीने वरच्या फळीत फलंदाजी केलेली नाही. मात्र तो जेवढ्या वेळेसाठी फलंदाजीसाठी आला, तेवढ्या वेळी सामन्याचं थेट प्रक्षेपण पाहणाऱ्या प्रेक्षकांची संख्या वधारलेली दिसून आल्याची उदाहरणे आहेत. त्यामुळे आया यंदाच्या आयपीएलमध्ये धोनी काय निर्णय घेणार याबाबत उत्सुकता असेल.  

English
हिंदी सारांश
Web Title : Dhoni's Role in CSK: Impact Player, Mentor, or Something Else?

Web Summary : With IPL nearing, speculation surrounds Dhoni's role in CSK. Will he be an impact player, mentor, or retire? Sanju Samson's arrival adds complexity, raising questions about Dhoni's place and batting order.
टॅग्स :महेंद्रसिंग धोनीचेन्नई सुपर किंग्सआयपीएल २०२६आयपीएल २०२४