Join us  

IPL 2020 : महेंद्रसिंग धोनी चेन्नईसाठी रवाना; CSKच्या ट्रेनिंग कॅम्पमध्ये दाखल

सुरेश रैना, पियूष चावला, दीपक चहर हे चेन्नईत दाखल झाले असून आता धोनीही येत्या काही वेळात चेन्नईत दाखल होईल.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2020 4:15 PM

Open in App

इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल) संयुक्त अरब अमिराती ( यूएई) येथे होणाऱ्या 13व्या मोसमात धडाकेबाज फलंदाजी करण्यासाठी महेंद्रसिंग धोनी सज्ज झाला आहे. जुलै 2019पासून धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. 19 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या आयपीएलमध्ये तो पुन्हा अॅक्शन मोडमध्ये दिसणार आहे. त्यासाठी धोनी शुक्रवारी झारखंड येथून चेन्नईसाठी रवाना झाला आहे. झारखंड विमानतळावरील त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. चेन्नई सुपर किंग्सच्या सराव शिबिरापूर्वी धोनीनं कोरोना चाचणी केली आणि ती निगेटिव्ह आली. त्यामुळे तो आता अन्य खेळाडूंसोबत सराव शिबिरात सहभाग घेऊ शकणार आहे. 

OMG : पाकिस्तानविरुद्धच्या कसोटीत स्टुअर्ट ब्रॉडला जाणवला श्वसनाचा त्रास अन्....

मार्चमध्ये होणाऱ्या आयपीएलमधून तो टीम इंडियात पुनरागमन करण्यासाठी सज्ज होता, परंतु कोरोना व्हायरसमुळे आयपीएल पुढे ढकलण्यात आली. ती होणार की नाही, यावरही शंका होती. पण, अखेर आयपीएलचा मार्ग मोकळा झाला आहे. धोनी आयपीएलसाठी सज्ज झाला आहे. वन डे वर्ल्ड कपनंतर धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहेत. लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून तो रांची येथील फार्महाऊसवर आहे. केंद्र सरकारनंही परवानगी दिल्यानंतर सर्व फ्रँचायझींनी आपापल्या खेळाडूंना एका ठिकाणी एकत्रित आणण्याची तयारी सुरू केली आहे. माजी विजेत्या चेन्नई सुपर किंग्सनंही कॅम्प बोलावले आहे.  सुरेश रैना, पियूष चावला, दीपक चहर हे चेन्नईत दाखल झाले असून आता धोनीही येत्या काही वेळात चेन्नईत दाखल होईल.

धोनीनं 90 कसोटी सामन्यांत 38.09 च्या सरासरीनं 6 शतकं व 33 अर्धशतकांसह 4876 धावा केल्या आहेत. 350 वन डे क्रिकेटमध्ये त्याची सरासरी ही 50.57 इतकी आहे. त्याच्या 10773 धावांत 10 शतकं व 73 अर्धशतकांचा समावेश आहे. ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये त्यानं 98 सामन्यांत 1617 धावा केल्या आहेत. यष्टिरक्षणात कसोटीत त्याच्या नावावर 256 झेल व 38 स्टम्पिंग, वन डेत 321 झेल व 123 स्टम्पिंग आणि ट्वेंटी-20त 57 झेल व 34 स्टम्पिंग आहेत. 

अन्य महत्त्वाच्या बातम्या

IPL 2020 : मुंबई इंडियन्ससाठी मोठी बातमी; रोहित शर्माच्या चेहऱ्यावर फुलले हास्य!

IPL 2020 : इंग्लंड-ऑस्ट्रेलिया मालिका ठरली; CSK, RCB अन् KKR फ्रँचायझींची चिंता वाढली

Bowl Out काय असतं रे भाऊ? पाक कर्णधाराकडे नव्हतं उत्तर; इरफान पठाणनं सांगितला किस्सा

पाकिस्तानचा पोपट झाला; 3911 दिवसांनी फलंदाजाला दिली संधी, पण त्याला फोडता आला नाही 'भोपळा'!

शाब्बास; UPSC परीक्षेत अंध मुलीचं घवघवीत यश, मौहम्मद कैफनं उलगडला तिचा प्रेरणादायी प्रवास!

टॅग्स :आयपीएल 2020महेंद्रसिंग धोनीचेन्नई सुपर किंग्स