Join us  

महेंद्रसिंग धोनीला आणखी एक मान, दशकातील सर्वोत्तम ICC Men's ODI Teamचे नेतृत्वही माहीकडे

ICC च्या दशकातील पुरस्कारांची आज घोषणा झाली. भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीनं दशकातील सर्वोत्तम ट्वेंटी-20 संघाचे नेतृत्व पटकावले आहे

By स्वदेश घाणेकर | Published: December 27, 2020 2:49 PM

Open in App

ICC च्या दशकातील पुरस्कारांची आज घोषणा झाली. भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीनं दशकातील सर्वोत्तम ट्वेंटी-20 संघाचे नेतृत्व पटकावले आहे. आयसीसीनं यासाठी ऑनलाईन मतदान घेतलं होतं आणि त्यानुसार ही घोषणा करण्यात आली. ट्वेंटी-20 पाठोपाठ वन डे संघाचे नेतृत्वही धोनीकडेच सोपवण्यात आले असून अंतिम ११मध्ये तीन भारतीयांचा समावेश आहे.दशकातील सर्वोत्तम वन डे संघ - रोहित शर्मा, डेव्हिड वॉर्नर, विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स, शकिब अल हसन, महेंद्रसिंग धोनी ( कर्णधार), बेन स्टोक्स, मिचेल स्टार्क, ट्रेंट बोल्ट, इम्रान ताहीर, लसिथ मलिंगा. 

दशकातील सर्वोत्तम महिलांचा वन डे संघ- अॅलिसा हिली, सुझी बॅट्स, मिताली राज, मेग लॅनिंग ( कर्णधार), स्टेफनी टेलर, साराह टेलर, एलिसे पेरी, डेन व्हॅन निएकर्क, मेरीझॅपे कॅप्प, झुलन गोस्वामी, अनिसा मोहम्मद दशकातील सर्वोत्तम ट्वेंटी-20 संघ -  रोहित शर्मा, अॅरोन फिंच, ख्रिस गेल, विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स, ग्लेन मॅक्सवेल, महेंद्रसिंग धोनी ( कर्णधार), किरॉन पोलार्ड, राशीद खान, जसप्रीत बुमराह, लसिथ मलिंगा. दशकातील सर्वोत्तम ट्वेंटी-20 संघ महिला - अॅलिसा हिली, सोफी डेव्हिन, सुझी बॅट्स, मेग लॅनिंग ( कर्णधार), हरमनप्रीत कौर, स्टेफनी टेलर, डेंड्रा डॉटिन, एलिसा पेरी, अॅन श्रुबसोल, मीगन स्कट, पूनम यादव स्कॉटलंडच्या कॅथरीन ब्रीसनं आयसीसीच्या संलग्न संघटनेतील दशकातील सर्वोत्तम महिला क्रिकेटपटूचा मान पटकावला. तिनं ५०च्या सरासरीनं धावा केल्या , तर ९.९३च्या सरासरीनं गोलंदाजी केली.   आयसीसीच्या संलग्न संघटनेतील दशकातील सर्वोत्तम पुरुष क्रिकेटपटूचा मान कायले कोएत्झरनं पटकावला. स्कॉटलंडच्या या फलंदाजानं ४५.५४च्या सरासरीनं २२७७ धावा केल्या.    नामांकनंसर गार्फिल्ड सोबर्स पुरस्कार ( दशकातील सर्वोत्तम पुरुष क्रिकेटपटू ) - आर अश्विन ( भारत) , विराट कोहली ( भारत), जो रूट ( इंग्लंड) , कुमार संगकारा ( श्रीलंका) , एबी डिव्हिलियर्स ( दक्षिण आफ्रिका), स्टीव्ह स्मिथ ( ऑस्ट्रेलिया), केन विलियम्सन ( न्यूझीलंड) राचेल हेयहो फ्लिंट पुरस्कार ( दशकालीत सर्वोत्तम महिला क्रिकेटपटू) - सुझी बॅट्स ( न्यूझीलंड), मेग लॅनिंग ( ऑस्ट्रेलिया), एलिसे पेरी ( ऑस्ट्रेलिया), मिताली राज ( भारत), साराह टेलर ( इंग्लंड), स्टेफनी टेलर ( वेस्ट इंडिज) दशकातील सर्वोत्तम कसोटी क्रिकेटपटू ( पुरुष)  - जेम्स अँडरसन ( इंग्लंड), रंगना हेराथ ( श्रीलंका), विराट कोहली ( भारत), जो रूट ( इंग्लंड), यासीर शाह ( पाकिस्तान), स्टीव्ह स्मिथ  ( ऑस्ट्रेलिया), केन विलियम्सन ( न्यूझीलंड)  दशकातील सर्वोत्तम वन डे क्रिकेटपटू ( पुरुष) - महेंद्रसिंग धोनी ( भारत), विराट कोहली ( भारत), लसिथ मलिंगा ( श्रीलंका), कुमार संगकारा ( श्रीलंका), रोहित शर्मा ( भारत), मिचेल स्टार्क ( ऑस्ट्रेलिया), एबी डिव्हिलियर्स ( दक्षिण आफ्रिका) दशकातील सर्वोत्तम वन डे क्रिकेटपटू ( महिला) - सुझी बॅट्स ( न्यूझीलंड), झुलन गोस्वामी ( भारत), मेग लॅनिंग ( ऑस्ट्रेलिया), एलिसे पेरी ( ऑस्ट्रेलिया), मिताली राज ( भारत), स्टेफनी टेलर ( वेस्ट इंडीज)  दशकातील सर्वोत्तम ट्वेंटी-20 क्रिकेटपटू ( पुरुष ) - अॅरोन फिंच ( ऑस्ट्रेलिया), ख्रिस गेल ( वेस्ट इंडिज), राशिद खान ( अफगाणिस्तान), विराट कोहली ( भारत), लसिथ मलिंगा ( श्रीलंका), रोहित शर्मा ( भारत), इम्रान ताहीर ( दक्षिण आफ्रिका).  

टॅग्स :महेंद्रसिंग धोनीआयसीसी