Join us

BREAKING: धोनीचा धक्का! CSK चं कर्णधारपद सोडलं, खास भिडूकडे सोपवलं नेतृत्व

आयपीएल विश्वात मोठी घडामोड समोर आली आहे. चेन्नई सुपरकिंग्ज संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी यानं संघाचं कर्णधारपद सोडण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2022 15:00 IST

Open in App

आयपीएल विश्वात मोठी घडामोड समोर आली आहे. चेन्नई सुपरकिंग्ज संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी यानं संघाचं कर्णधारपद सोडण्याचा निर्णय जाहीर केला आहे. धोनीनं चेन्नई सुपरकिंग्ज संघाच्या नेतृत्त्वाची जबाबदारी आता अष्टपैलू आणि आपला खास भिडू रविंद्र जडेजाकडे दिली आहे. २०१२ सालापासून चेन्नई सुपर किंग्ज संघाचा अविभाज्य भाग असलेला रविंद्र जडेजा सीएसकेचं नेतृत्त्व करणारा तिसरा खेळाडू ठरणार आहे.

धोनीनं कर्णधारपदावरुन पायऊतार होण्याचा निर्णय घेतला असला तरी चेन्नईच्या संघाचं यापुढेही प्रतिनिधीत्व करताना पाहायला मिळणार असल्याचंही जाहीर करण्यात आलं आहे. चेन्नई सुपरकिंग्ज संघाच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन याची माहिती देण्यात आली आहे. 

टॅग्स :महेंद्रसिंग धोनीचेन्नई सुपर किंग्सरवींद्र जडेजा
Open in App