Join us

IPL 2023 साठी 'माही' CSKच्या ताफ्यात सामील; चेन्नई विमानतळावर धुमधडाक्यात स्वागत

MS dhoni CSK: जगातील सर्वात लोकप्रिय ट्वेंटी-20 लीग अर्थात इंडियन प्रीमियर लीग आपल्या आगामी हंगामाकडे कूच करत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2023 13:06 IST

Open in App

csk dhoni । नवी दिल्ली : जगातील सर्वात लोकप्रिय ट्वेंटी-20 लीग अर्थात इंडियन प्रीमियर लीग (IPL) आपल्या आगामी हंगामाकडे कूच करत आहे. आयपीएल 2023 चा थरार 31 मार्चपासून रंगणार आहे. त्यापूर्वीच स्पर्धेची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. संघातील खेळाडू आपापल्या संघाच्या कॅम्पमध्ये सामील होत आहेत. भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि चेन्नई सुपर किंग्जचा (CSK) विद्यमान कर्णधार महेंद्रसिंग धोनी देखील सीएसकेच्या ताफ्यात सामील झाला आहे. धोनीही चेन्नईला पोहोचला असून विमानतळावर चाहत्यांनी त्याचे जोरदार स्वागत केले.

दरम्यान, चेन्नईच्या चाहत्यांना धोनीबद्दल विशेष प्रेम आहे आणि ते त्यांच्या स्टार कर्णधाराला 'थाला' म्हणून संबोधतात. धोनी विमानतळावर येत असल्याचे समजताच चाहते तिथे पोहोचू लागले आणि धोनी आल्यावर त्याच्यावर फुलांचा वर्षाव करण्यात आला. एमएस धोनीच्या विमानतळावर झालेल्या भव्य स्वागताची एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे की, ढोल ताशांच्या गजरात चाहते आपल्या कर्णधाराचे स्वागत करत आहेत. 

IPL 2023साठी CSKचे वेळापत्रक - 

  1. 31 मार्च - सीएसके विरूद्ध गुजरात टायटन्स - अहमदाबाद 
  2. 3 एप्रिल - सीएसके विरूद्ध लखनौ - चेन्नई 
  3. 8 एप्रिल - सीएसके विरूद्ध मुंबई इंडियन्स - मुंबई
  4. 12 एप्रिल - सीएसके विरूद्ध राजस्थान रॉयल्स - चेन्नई
  5. 17 एप्रिल - सीएसके विरूद्ध आरसीबी - बंगळुरू
  6. 21 एप्रिल - सीएसके विरूद्ध हैदराबाद - चेन्नई
  7. 23 एप्रिल - सीएसके विरूद्ध केकेआर - कोलकाता 
  8. 27 एप्रिल - सीएसके विरूद्ध रादस्थान रॉयल्स - जयपूर
  9. 30 एप्रिल - सीएसके विरूद्ध पंजाब - चेन्नई
  10. 4 मे - सीएसके विरूद्ध लखनौ - लखनौ
  11. 6 मे - सीएसके विरूद्ध मुंबई इंडियन्स - चेन्नई
  12. 10 मे - सीएसके विरूद्ध दिल्ली कॅपिटल्स - चेन्नई
  13. 14 मे - सीएसके विरूद्ध केकेआर - चेन्नई 
  14. 20 मे - सीएसके विरूद्ध दिल्ली कॅपिटल्स - दिल्ली 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :महेंद्रसिंग धोनीचेन्नई सुपर किंग्सआयपीएल २०२२व्हायरल फोटोज्
Open in App