भारतीय क्रिकेट चाहत्यांमध्ये महेंद्रसिंह धोनीची कमालीची क्रेझ दिसून येते. आगामी आयपीएलमध्ये पुन्हा त्याची झलक पाहण्यासाठी चाहते आतुर झाले असताना धोनीची यंदाच्या हंगामा आधीची नेट्समधील पहिली झलक समोर आली आहे. महेंद्रसिंह धोनीने आगामी आयपीएल हंगामाची तयारी सुरु केली आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
जो फोटो व्हायरल होतोय त्यात धोनी नेट्समध्ये प्रॅक्टिस करताना दिसून येत आहे. धोनी हा क्रिकेटमधील एक ब्रँड आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यावरही त्याची क्रेझ कमी झालेली नाही. व्हायरल होणाऱ्या फोटोवर उमटणाऱ्या कमेंट्सवरून त्याला आगामी हंगामात खेळताना पाहण्यासाठी चाहते किती आतुर झाले आहेत, त्याचेही संकेत मिळतात.
यंदा अनकॅप्ड प्लेयरच्या रुपात मैदानात उतरणार आहे धोनी
२०१९ मध्ये सोशल मीडियावरील एका पोस्टच्या माध्यमातून आंतरारष्ट्रीय क्रिकेटमधून थांबतोय, असे सांगत धोनीनं अनेक चाहत्यांना धक्का दिला होता. पण त्यानंतर त्याने आयपीएलमध्ये खेळण्याचा निर्णय घेतला अन् आगामी हंगामासाठीही तो चेन्नईच्या ताफ्याता भाग झाला. विशेष म्हणजे यंदाच्या हंगामात CSK कडून तो अनकॅप्ड प्लेयरच्या रुपात रिटेन झाला आहे. ही गोष्ट तशी धोनीसाठी घाट्याचा सौदा ठरली, पण चाहत्यांसाठी अन् CSK साठी पुन्हा एकदा तो मैदानात उतरणार ही मोठी पर्वणीच आहे.
CSK च्या चाहत्यांप्रमाणे थालाही पुन्हा मैदानात उतरण्यासाठी उत्सुक
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यावर आयपीएलचा एखादा हंगाम खेळून तो इथंही थांबेल. त्यानंतर तो CSK च्या ताफ्यात मेंटॉर वैगेरच्या रुपात कायम राहिल, अशा काही चर्चा मागील चार-पाच हंगामात पाहायला मिळाल्या. पण धोनी वयाच्या ४३ व्या वर्षीही खेळाडूच्या रुपात पुन्हा एकदा मैदानात उतरण्यास सज्ज आहे. नेट्समधील त्याची झलक तोही CSK संघातील युवा खेळाडूंसह चाहत्यांप्रमाणे आगामी हंगामासाठी उत्सुक असल्याचा सीन दाखवणारा आहे.
धोनीला खुणावताहेत खास विक्रम
२००८ च्या पहिल्या हंगामापासून आयपीएलशी कनेक्ट असणाऱ्या महेंद्रसिंह धोनीसाठी यंदाच्या हंगामात अनेक विक्रम खुणावत आहेत. त्याचीस एक विक्रम आहे अॅडम गिलख्रिस्टचा. एका अर्धशतकासह तो ऑस्ट्रेलियन खेळाडूचा विक्रम मोडीत काढू शकतो. गिलख्रिस्ट याने वयाच्या ४१ व्या वर्षी अर्धशतक झळकावल्याचा विक्रम आहे. धोनीला या हंगामात एका मोठ्या खेळीसह गिलख्रिस्टचा विक्रम मोडीत काढण्याची संधी असेल. याशिवाय CSK कडून सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीतही टॉपला जाण्याची संधी त्याच्याकडे आहे. सध्याच्या घडीला रैना या यादीत ४६८७ धावांसह टॉपला आहे. धोनीला हा विक्रम मोडीत काढायला फक्त १८ धावांची गरज आहे.
Web Title: MS Dhoni Gearing Up For IPL 2025 First Net Sessions Photo Goes Viral See Pics
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.