Join us

संघर्ष काळात दिली MS Dhoni ने साथ, 'माही'चे ते बोल कामी आले - विराट कोहली

विराट कोहलीचा गेल्या काही महिन्यांपासून खराब फॉर्म सुरू होता. यावेळी त्याच्यावर अनेकांनी टीका केली. पण, आता त्याचा फॉर्म परत आला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2022 11:20 IST

Open in App

विराट कोहलीचा (Virat Kohli) गेल्या काही महिन्यांपासून खराब फॉर्म सुरू होता. यावेळी त्याच्यावर अनेकांनी टीका केली. पण, आता त्याचा फॉर्म परत आला आहे. टी20 विश्वचषकात त्याने उत्कृष्ठ अशी खेळी केली. खराब फॉर्ममुळे त्याने आशिया कप अगोदर एक महिना ब्रेक घेतला होता. त्याने या काळात बॅटला हातही लावला नव्हता. या काळात त्याला माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने मेसेज केला होता. या मेसेजचा खुलासा विराट कोहली याने एक मुलाखतीमध्ये केला आहे. 

आता विराट कोहलीने (Virat Kohli) पुन्हा खेळात पुनरागमन केले आहे. कोहलीने धोनीचा खास मेसेजचा खुलासा केला आहे.या मेसेजमुळे कोहलीला पुन्हा फॉर्ममध्ये येण्यास मदत झाली.यावेळी फक्त धोनीने मला मेसेज केला होता, असंही कोहली म्हणाला. 'जेव्हा तुमच्याकडून बलवान असण्याची अपेक्षा केली जाते, तुम्हाला एक मजबूत व्यक्ती म्हणून पाहिले जाते तेव्हा लोक तुम्हाला विचारायला विसरतात की तुम्ही कसे आहात' हा मेसेज त्यावेळी महेंद्र सिंग दोनीने मला केला होता . माही भाईने सांगितलेल्या या गोष्टीने मला धक्काच बसला, असंही विराट म्हणाला. 

"माही भाई माझ्यासाठी एक अशी व्यक्ती आहे ज्याने माझे करिअर करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. धोनीसोबतची मैत्री आणि नाते हे माझ्यासाठी आशीर्वाद सारखे आहे, तोच एकमेव असा व्यक्ती आहे ज्याने मी खूप अस्वस्थ असताना माझ्याशी संपर्क साधला. माझ्यापेक्षा ज्येष्ठ व्यक्ती आणि आमच्यातील परस्पर आदर विलक्षण आहे, असंही विराट म्हणाला. 

आशिया चषक 2022 मध्ये कोहलीने मोठी कामगीरी केली आहे. ५ सामने खेळून एकूण २७६ धावा करण्यात तो यशस्वी झाला. तर कोहलीने जवळपास ३ वर्षांनंतर आलेल्या आशिया कपमध्येच शतक झळकावले. विराट या विश्वचषकात आतापर्यंत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. कोहलीने ५ डावात २४६ धावा केल्या आहेत. कोहलीने आतापर्यंत ३ अर्धशतके झळकावली आहेत.

टॅग्स :विराट कोहलीमहेंद्रसिंग धोनी
Open in App