एक झलक, सबसे अलग! धोनीचा सरावादरम्यानचा 'तो' व्हिडीओ का होतोय इतका व्हायरल?

MS Dhoni Viral Video: इंडियन प्रीमियर लीग २०२६ चा थरार सुरू होण्यापूर्वीच चेन्नई सुपर किंग्जच्या गोटात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. कॅप्टन कूल म्हणजेच महेंद्रसिंग धोनी सराव सत्रासाठी चेन्नईत दाखल झाला असून, त्याच्या एका अनोख्या व्हिडिओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2026 16:34 IST2026-03-03T16:32:27+5:302026-03-03T16:34:56+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
MS Dhoni Dances During CSK Practice Session; Video of His Viral Wide Ball Reaction Goes Viral | एक झलक, सबसे अलग! धोनीचा सरावादरम्यानचा 'तो' व्हिडीओ का होतोय इतका व्हायरल?

एक झलक, सबसे अलग! धोनीचा सरावादरम्यानचा 'तो' व्हिडीओ का होतोय इतका व्हायरल?

इंडियन प्रीमियर लीग २०२६ चा थरार सुरू होण्यापूर्वीच चेन्नई सुपर किंग्जच्या गोटात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. कॅप्टन कूल म्हणजेच महेंद्रसिंग धोनी सराव सत्रासाठी चेन्नईत दाखल झाला असून, त्याच्या एका अनोख्या व्हिडिओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. सरावादरम्यान धोनी चक्क मैदानात डान्स करताना दिसला, ज्याचा व्हिडिओ चेन्नई सुपर किंग्जने अधिकृतपणे शेअर केला आहे.

चेन्नई सुपर किंग्जने त्यांच्या एक्स काउंटवरून धोनीची एक मजेशीर क्लिप शेअर केली. सरावादरम्यान एका ऑफ-स्पिन गोलंदाजाने वाईड बॉल टाकला, यानंतर धोनीने अनोख्या अंदाजात वाईडचा सिग्नल दिला. धोनीचा हा अंदाज पाहून चाहते खूश झाले. सध्या चेन्नईत सुरू असलेल्या सराव सत्रात अनेक भारतीय खेळाडू सामील झाले आहेत. कर्णधार ऋतुराज गायकवाड आपल्या फूटवर्क आणि टाइमिंगवर विशेष मेहनत घेताना दिसत आहे. तसेच, यंदा सीएसकेचा भाग असलेला सरफराज खान हा अतिशय बारकाईने धोनीच्या सराव सत्रांचे निरीक्षण करताना दिसला. स्थानिक खेळाडूंमध्ये प्रशांत वीर आणि कार्तिक शर्मा यांनी आपल्या वेगवान गोलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

सध्या परदेशी खेळाडू आणि मुख्य प्रशिक्षक अद्याप चेन्नईत पोहोचलेले नाहीत. त्यामुळे सध्या कोचिंगची जबाबदारी श्रीधरन श्रीराम आणि राजीव कुमार सांभाळत आहेत, तर स्ट्रेंथ अँड कंडिशनिंगसाठी ग्रेग किंग संघासोबत काम करत आहेत. दुसरीकडे, संजू सॅमसन आणि शिवम दुबे हे सध्या टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघात व्यस्त आहेत. ८ मार्च रोजी होणाऱ्या विश्वचषक फायनलनंतर ते सीएसकेच्या कॅम्पमध्ये सामील होण्याची शक्यता आहे.

आयपीएल २०२६ साठी चेन्नई सुपर किंग्जचा संघ:

ऋतुराज गायकवाड (कर्णधार), एमएस धोनी, संजू सॅमसन, आयुष म्हात्रे, देवाल्ड ब्रुविस, उर्विल पटेल, शिवम दुबे, जेमी ओव्हरटन, रामकृष्ण घोष, नूर अहमद, खलील अहमद, अंशुल कंबोज, गुर्जपनीत सिंग, श्रेयस गोपाल, मुकेश चौधरी, नाथन एलिस, अकील होसेन, प्रशांत वीर, कार्तिक शर्मा, मॅथ्यू शॉर्ट, अमन खान, सरफराज खान, मॅट हेन्री, राहुल चहर, जॅक फौल्क्स

Web Title : आईपीएल 2026 से पहले धोनी का डांस वीडियो वायरल, उत्साह का माहौल।

Web Summary : चेन्नई सुपर किंग्स के धोनी आईपीएल 2026 के लिए कड़ी मेहनत कर रहे हैं। उनका एक वीडियो वायरल हुआ है जिसमें वह मज़ाकिया अंदाज़ में वाइड बॉल का इशारा कर रहे हैं। भारतीय खिलाड़ी अभ्यास पर ध्यान केंद्रित कर रहे हैं, जबकि विदेशी स्टाफ के आने तक कोच जिम्मेदारी संभाल रहे हैं। टी20 विश्व कप के खिलाड़ी बाद में शामिल होंगे।

Web Title : MS Dhoni's viral dance video sparks excitement before IPL 2026.

Web Summary : Chennai Super Kings' Dhoni is training hard for IPL 2026. A video of him playfully signaling a wide ball has gone viral. Indian players are focused on practice, while coaches handle duties until foreign staff arrive. T20 World Cup players will join later.