Join us

Video - ... आता धोनी घेणार झिवाकडून धडे

टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीची राजकुमारी झिवा सोशल मीडियावर फारच प्रसिद्ध झाली आहे. झिवाचा आणखी एक क्यूट व्हिडिओ आता इन्स्टाग्रामवर पोस्ट करण्यात आला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2018 13:07 IST

Open in App
ठळक मुद्देझिवाचा आणखी एक क्यूट व्हिडिओ आता इंस्टाग्राम पोस्ट करण्यात आला आहे. धोनीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर केला असून त्यामध्ये तो छोट्या झिवाकडून डान्स स्टेप्स शिकत आहे.धोनीच्या चाहत्यांना झिवाचा हा डान्स खूप आवडला असून त्यांनी झिवा धोनीपेक्षा खूपच सुंदर नाचते असं म्हटलं आहे. 

नवी दिल्ली - टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीची राजकुमारी झिवा सोशल मीडियावर फारच प्रसिद्ध झाली आहे. झिवाचा आणखी एक क्यूट व्हिडिओ आता इन्स्टाग्रामवर पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये झिवा धोनीला डान्स शिकवताना दिसत आहे. धोनीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर केला असून त्यामध्ये तो छोट्या झिवाकडून डान्स स्टेप्स शिकत असलेलं पाहायला मिळत आहे. 

छोट्या झिवाच्या क्यूटनेसमुळे नेटकऱ्यांनी या व्हिडिओला चांगलीच पसंती दिली आहे. झिवा या व्हिडीओमध्ये धोनीला डान्सच्या काही स्टेप्स शिकवत आहे आणि धोनी तिच्या त्या स्टेप्स फॉलो करायचा प्रयत्न करत नाचत आहे. मात्र धोनीला तिच्यासारखं  डान्स करणं जमत नाही. तसेच धोनीच्या चाहत्यांना झिवाचा हा डान्स खूप आवडला असून त्यांनी झिवा धोनीपेक्षा सुंदर नाचते असं म्हटलं आहे. 

झिवा आणि धोनीचा हा धमाल डान्स करतानाचा व्हिडीओ धोनीची पत्नी साक्षीने काढला आहे. झिवाच्या या डान्स व्हिडीओला आतापर्यंत चार लाखांहून अधिक लोकांनी लाईक केलं आहे. धोनीसोबत छोट्या झिवाचा खट्याळपणा कॅमेऱ्यात कैद करणारे काही गोड व्हिडिओ हे आधीही अनेकदा पोस्ट करण्यात आले आहेत. 

टॅग्स :महेंद्रसिंह धोनीजीवा धोनीनृत्य