Join us

महेंद्रसिंग धोनीकडे ICCच्या दशकातील ट्वेंटी-20 संघाचे नेतृत्व; जाणून घ्या Playing XI!

ICC च्या दशकातील पुरस्कारांची आज घोषणा झाली.

By स्वदेश घाणेकर | Updated: December 27, 2020 14:33 IST

Open in App

ICC च्या दशकातील पुरस्कारांची आज घोषणा झाली. भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीनं दशकातील सर्वोत्तम ट्वेंटी-20 संघाचे नेतृत्व पटकावले आहे. आयसीसीनं यासाठी ऑनलाईन मतदान घेतलं होतं आणि त्यानुसार ही घोषणा करण्यात आली. दशकातील सर्वोत्तम ट्वेंटी-20 संघ -  रोहित शर्मा, अॅरोन फिंच, ख्रिस गेल, विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स, ग्लेन मॅक्सवेल, महेंद्रसिंग धोनी ( कर्णधार), किरॉन पोलार्ड, राशीद खान, जसप्रीत बुमराह, लसिथ मलिंगा.

दशकातील सर्वोत्तम ट्वेंटी-20 संघ महिला - अॅलिसा हिली, सोफी डेव्हिन, सुझी बॅट्स, मेग लॅनिंग ( कर्णधार), हरमनप्रीत कौर, स्टेफनी टेलर, डेंड्रा डॉटिन, एलिसा पेरी, अॅन श्रुबसोल, मीगन स्कट, पूनम यादव स्कॉटलंडच्या कॅथरीन ब्रीसनं आयसीसीच्या संलग्न संघटनेतील दशकातील सर्वोत्तम महिला क्रिकेटपटूचा मान पटकावला. तिनं ५०च्या सरासरीनं धावा केल्या , तर ९.९३च्या सरासरीनं गोलंदाजी केली.   आयसीसीच्या संलग्न संघटनेतील दशकातील सर्वोत्तम पुरुष क्रिकेटपटूचा मान कायले कोएत्झरनं पटकावला. स्कॉटलंडच्या या फलंदाजानं ४५.५४च्या सरासरीनं २२७७ धावा केल्या.    नामांकनं

सर गार्फिल्ड सोबर्स पुरस्कार ( दशकातील सर्वोत्तम पुरुष क्रिकेटपटू ) - आर अश्विन ( भारत) , विराट कोहली ( भारत), जो रूट ( इंग्लंड) , कुमार संगकारा ( श्रीलंका) , एबी डिव्हिलियर्स ( दक्षिण आफ्रिका), स्टीव्ह स्मिथ ( ऑस्ट्रेलिया), केन विलियम्सन ( न्यूझीलंड) राचेल हेयहो फ्लिंट पुरस्कार ( दशकालीत सर्वोत्तम महिला क्रिकेटपटू) - सुझी बॅट्स ( न्यूझीलंड), मेग लॅनिंग ( ऑस्ट्रेलिया), एलिसे पेरी ( ऑस्ट्रेलिया), मिताली राज ( भारत), साराह टेलर ( इंग्लंड), स्टेफनी टेलर ( वेस्ट इंडिज)  

टॅग्स :महेंद्रसिंग धोनीआयसीसी