MS Dhoni Breaks Suresh Raina's Record : आयपीएलच्या १८ व्या हंगामाची धमाक्यात सुरुवात करणाऱ्या चेन्नई सुपर किंग्ज संघावर घरच्या मैदानात पराभवाची नामुष्की ओढावली. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघानं ५० धावांनी विजय मिळवत १७ वर्षांनी चेपॉकचे मैदान गाजवले, या सामन्यात सुरुवातीपासून आरसीबीचा जलवा पाहायला मिळाला. संघ पराभवाच्या उंबरठ्यावर असताना एमएस धोनी मैदानात आला अन् त्याने चाहत्यांच्या डोळ्याचे पारणे फेडणारी खेळी केली. धोनीच्या भात्यातून षटकार-चौकार पाहायला मिळाले. एवढेच नाही तर तो शेवटपर्यंत नाबाद राहिला. यादरम्यान धोनीनं खास विक्रमाला गवसणी घातली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
धोनीनं मोडला रैनाचा विक्रम
महेंद्रसिंह धोनी हा आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. याआधी हा विक्रम सुरेश रैनाच्या नावे होता. धोनीनं आरसीबी विरुद्धच्या सामन्यात ३ चौकार आणि २ षटकाराच्या मदतीने १६ चेंडूत नाबाद ३० धावांची खेळी केली. या सामन्यात क्रुणाल पांड्याच्या गोलंदाजीवर उत्तुंग षटकार मारताच धोनीनं रैनाला मागे टाकले.
MS Dhoni Faster Than Light Stumping : धोनीनं विकेटमागे सॉल्टची केलेली 'शिकार' बघून कोहलीही स्तब्ध
२३६ व्या सामन्यात धोनी झाला चेन्नईचा टॉपर
आयपीएल स्पेशलिस्ट सुरेश रैनानं चेन्नई सुपर किंग्जकडून खेळताना ४६८७ धावा केल्याचा विक्रम होता. आता धोनी त्याच्या पुढे निघून गेला आहे. आरसीबी विरुद्धच्या सामन्यात १९ धावा करताच धोनीनं खास विक्रम सेट केला. चेन्नईकडून २३६ सामन्यात त्याच्या नावे ४६९९ धावा जमा झाल्या आहेत.
आयपीएलमध्ये CSK कडून सर्वाधिक धावा करणारे फलंदाज
एमएस धोनी – ४६९९ धावा
सुरेश रैना – ४६८७ धावा
फाफ डू प्लेसिस – २७२१ धावा
ऋतुराज गायकवाड – २४३३ धावा
अंबाती रायडू – १९३२ धावा
यष्टीमागेही आश्चर्यकारक कामगिरी
४३ वर्षीय महेंद्रसिह धोनी विकेटमागील कामगिरीनंही सर्वांचे लक्षवेधून घेत आहे. मुंबई इंडियन्स विरुद्धच्या पहिल्या सान्यात सूर्यकुमार यादवचा सेकंदाच्या आत खेळ खल्लास करणाऱ्या धोनीनं RCB विरुद्धच्या सामन्यात फिल सॉल्टचे अप्रतिम स्टंपिंग केल्याचे पाहायला मिळाले.
Web Title: MS Dhoni Breaks Suresh Raina's Record To Become CSK's Leading Run Scorer In IPL History
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.