IPL 2026 : MS धोनी तयारीला लागला! नेट प्रॅक्टिस वेळी दिसली खास झलक; व्हिडिओ होतोय व्हायरल

CSK च्या स्टार खेळाडूचा सरावादरम्यानचा एक व्हिडिओ समोर आला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2026 18:08 IST2026-01-24T18:07:28+5:302026-01-24T18:08:22+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
MS Dhoni Begins IPL 2026 Preparations Chennai Super Kings CSK Indian Premier League Watch Video | IPL 2026 : MS धोनी तयारीला लागला! नेट प्रॅक्टिस वेळी दिसली खास झलक; व्हिडिओ होतोय व्हायरल

IPL 2026 : MS धोनी तयारीला लागला! नेट प्रॅक्टिस वेळी दिसली खास झलक; व्हिडिओ होतोय व्हायरल

कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनी पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानात उतरण्यासाठी सज्ज झाला आहे. चेन्नई सुपर किंग्सच्या ताफ्यातून तो पुन्हा एकदा IPL मध्ये खेळताना दिसणार आहे. आगामी स्पर्धेसाठी MS धोनीनं तयारीही सुरु केली आहे. CSK च्या स्टार खेळाडूचा सरावादरम्यानचा एक व्हिडिओ समोर आला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ तुफान व्हायरल होताना दिसत आहे.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

MS धोनीची व्हिडिओ व्हायरल

झारखंड राज्य क्रिकेट संघ (JSCA) ने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरुन धोनीच्या नेट प्रॅक्टिस सेशनचा एक छोटा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये धोनी पॅड्स घालताना दिसतो. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये, “पाहा कोण परत आलं आहे” असं कॅप्शन लिहिले आहे. "JSCAचा अभिमान,  महेंद्रसिंग धोनी" असा उल्लेखही यापोस्टमध्ये केल्याचा दिसतो. 

IPL 2026 : MS धोनीच्या CSK चं टेन्शन वाढलं! १४.२० कोटींचा 'वीर' जखमी; नेमकं काय घडलं?

यंदाचा हंगाम त्याच्यासाठी ठरु शकतो खास, कारण.. 

नेट्समध्ये सरावाला सुरुवात करण्याआधी  धोनी माजी भारतीय फलंदाज आणि JSCA अधिकारी सौरभ तिवारी यांच्याशी संवाद साधताना दिसला. IPL 2026 ची सुरुवात २६ मार्चपासून होण्याची शक्यता आहे. यंदाच्या हंगामातील अतिंम सामना हा ३१ मे रोजी खेळवला जाऊ शकतो. यंदाच्या हंगामात धोनी पुन्हा एकदा मैदानात उतरणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर तो IPL च्या माध्यमातून क्रिकेटशी कनेक्ट आहे.  यंदाचा हंगाम कदाचित त्याच्यासाठी अखेरचा ठरु शकतो. 

MS धोनी हा IPL मध्ये सर्वाधिक सामने खेळणारा खेळाडू 

महेंद्रसिंग धोनी हा IPL मध्ये सर्वाधिक सामने खेळणारा खेळाडू आहे. २००८ पासून आतापर्यंत त्याने २७८ सामन्यांत ३८.३० च्या सरासरीने आणि १३७.४५ च्या स्ट्राइक रेटने ५४३९ धावा केल्या आहेत. आयपीएल कारकिर्दीत त्याच्या बॅटमधून २४ अर्धशतके पाहायला मिळाली आहेत. नाबाद ८४ ही धोनीची IPL मधील सर्वोच्च धावसंख्या आहे. त्याच्या नावावर ३७५ चौकार आणि २६४ षटकारांचा रेकॉर्ड आहे.  IPL मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत धोनी सहाव्या क्रमांकावर आहे.

IPL मध्ये सर्वाधिक धावा

  • विराट कोहली- २८७ सामने, ८६६१ धावा
  • रोहित शर्मा- २७२ सामने, ७०४६ धावा
  • शिखर धवन- २२२ सामने, ६७६९ धावा
  • डेविड वॉर्नर- १८४ सामने, ६५६५ धावा
  • सुरेश रैना-२०५ सामने  ५५२८ धावा
  • महेंद्रसिंह धोनी  -२७८  सामने, ५४३९ धावा

Web Title : आईपीएल 2026: एमएस धोनी की तैयारी, नेट प्रैक्टिस वीडियो वायरल

Web Summary : एमएस धोनी चेन्नई सुपर किंग्स के साथ आईपीएल 2026 की तैयारी कर रहे हैं। उनके अभ्यास सत्र का एक वीडियो वायरल हो गया है। अंतरराष्ट्रीय क्रिकेट से संन्यास के बाद क्रिकेट से जुड़े रहने के कारण यह सीजन उनका आखिरी हो सकता है। वह 5439 रनों के साथ आईपीएल में सबसे ज्यादा रन बनाने वाले खिलाड़ी हैं।

Web Title : IPL 2026: MS Dhoni Prepares, Net Practice Video Goes Viral

Web Summary : MS Dhoni is preparing for IPL 2026 with Chennai Super Kings. A video of his practice session has gone viral. This season could be his last, as he remains connected to cricket after international retirement. He is the highest-scoring player in IPL, with 5439 runs.