भारतीय संघाचा माजी आणि चेन्नई सुपर किंग्सचा ( Chennai Super Kings) कर्णधार महेंद्रसिंग धोनी ( captain MS Dhoni) याचा सोशल मीडियावर नवा लुक व्हायरल होत आहे. इंडियन प्रीमिअर लीगचे १४वे पर्व कोरोना व्हायरसमुळे स्थगित करावे लागल्यानंतर सर्व खेळाडू आपापल्या घरी परतले. इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना होणारे खेळाडू मुंबईत क्वारंटाईनमध्ये आहेत. पण, धोनीच्या चाहत्यांना त्याच्या लूकची प्रतिक्षा होती आणि त्यांची ही प्रतिक्षा संपली. सोशल मीडियावर सध्या धोनीच्या नव्या लूकचीच चर्चा आहे. आयपीएल २०२१ स्थगित होण्यापूर्वी जसा धोनी दिसत होता, त्यापेक्षा फार वेगळा हा लूक आहे. Photo : महेंद्रसिंग धोनीच्या फार्म हाऊसचा थाटच न्यारा; 7 एकर परिसरात बांधलाय स्वप्नांचा बंगला!
धोनी सध्या रांची येथीत त्याच्या फार्म हाऊसवर आहे. तो तेथे त्याच्या पाळीव प्राण्यांसोबत वेळ घालवत आहेत. ३९ वर्षीय धोनी सप्टेंबर महिन्यात पुन्हा अॅक्शनमध्ये दिसणार आहे. चेन्नईनं ७ सामन्यांपैकी ५ सामने जिंकले आहेत. रांचीमधील मंदिर अन् धोनी...असं आहे श्रद्धेचं नातं; जाणून घ्या सर्वकाही
आयपीएलच्या नव्या तारखा आल्या समोर; BCCIचा मास्टर प्लान