MS Dhoni Sings Tu Jaane Na Song: भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी आयपीएलच्या यंदाच्या हंगामासाठी मैदानात उतरण्याआधी फिल्डबाहेरील कूल अंदाजानं चर्चेत आलाय. टीम इंडियाचा विकेट किपर बॅटर रिषभ पंतची बहिण साक्षीच्या लग्नाच्या कार्यक्रमातील धोनी आणि रैना यांच्या डान्सचा व्हिडिओ चर्चेत आला होता. आता त्यात नव्या व्हिडिओची भर पडलीये. धोनीनं आपल्यातील गाण्याचं टॅलेंट दाखवून मैफिल लुटल्याची गोष्ट चांगलीच चर्चेत आलीये.
नवरा-बायकोचा गोड आवाज अन् कमालीची केमिस्ट्री
सोशल मीडियावर महेंद्रसिंह धोनी आणि त्याची पत्नी साक्षी धोनी यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात हे स्वीट कपल लाइव्ह संगीत समारंभात बॉलिवूडमधील ‘तू जाने ना’ या गाणं गाताना पाहायला मिळते. धोनीची पोस्ट पडली अन् चर्चा नाही घडली असं कधीच होत नाही. आता तर त्याने चक्क गाणं गात मैफिल लुटलीये. लग्नाचा माहोल अन् धोनीनं बायकोच्या सूरात मिसळलेला सूर हा क्षण दोघांच्यातील खास केमिस्ट्रीची एक वेगळी छटाही दाखवून देणारा आहे.चाहत्यांना या जोडीचा नवा अंदाज चांगलाच भावला असून दोघांनी गायलेल्या गाण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसतोय. यावर लाईक्स अन् कमेंट्सची अक्षरश: बरसात होत आहे.
आधी डान्स केला अन् आता बायकोसोबत गायलेले गाणं ठरतंय सुपरहिट
रिषभ पंतच्या घरी लग्नाचा माहोल आहे. क्रिकेटरची बहिण साक्षी पंत आणि व्यावसायिक अंकित चौधरी यांच्या लग्नाच्या वेगवेगळ्या कार्यक्रमात अनेक स्टार क्रिकेटर सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले. धोनीशिवाय सुरेश रैना आणि त्याच्या पत्नीचीही लग्न कार्यक्रमात झलक दिसली. रिषभ पंत, रैना आणि धोनी यांनी दमा दम मस्त कलंदर या गाण्यावर केलेला भन्नाट डान्सचा व्हिडिओही सोशल मीडियावर गाजला. त्यानंतर आता धोनी साक्षीचं गाण सुपरहिट ठरताना दिसते.