चेन्नई सुपर किंग्सनं ( Chennai Super Kings) विजयादशमीच्या दिवशी इंडियन प्रीमिअर लीगचं ( IPL 2021) जेतेपद पटकावलं. अंतिम सामन्यात CSKनं कोलकाता नाइट रायडर्सवर ( KKR) २७ धावांनी विजय मिळवला. CSKचे हे चौथे जेतेपद ठरले आणि या जेतेपदानंतर महेंद्रसिंग धोनीची ( MS Dhoni) पत्नी साक्षी ( Sakshi) हिनं मैदानावर धाव घेत पतीला कडकडून मिठी मारली. सामन्यानंतर CSKचा कॅप्टन कूल धोनी Family Man झालेला पाहायला मिळाला. धोनी कुटुंबीयांचा हा भावनिक क्षण पाहून सारेच भारावले.
आयपीएल २०२०च्या पर्वात साखळी फेरीत गाशा गुंडाळणारा पहिला संघ चेन्नईच ठरला होता. त्यानंतर धोनीच्या संघानं यंदा फिनिक्स भरारी घेतली आणि ४० वर्षीय धोनीच्या नेतृत्वाखाली जेतेपदाचा चौकार मारला. या विजेतेपदासोबतच धोनी कुटुंबियांनी त्यांच्या फॅन्सला आणखी एक गोड बातमी दिली. धोनी व साक्षी हे पुन्हा आई-बाबा होणार आहेत आणि सुरेश रैनाची पत्नी प्रियांका हिनं या वृत्ताला दुजोरा दिला. साक्षी चार महिन्यांची प्रेग्नेंट आहे आणि २०२२मध्ये धोनीच्या घरी पुन्हा पाळणा हलणार आहे.
ऋतुराज गायकवाड व फॅफ ड्यू प्लेसिस ही जोडी यंदाच्या आयपीएलमधील सर्वात यशस्वी सलामीवीर जोडी ठरली. त्यांनी ७५२ हून अधिक धावा केल्या. ऋतुराज ( ३२), रॉबीन उथप्पा (१५ चेंडूंत ३ षटकारांसह ३१ धावा), मोईन अली (३७) आणि . फॅफनं ( ५९ चेंडूंत ७ चौकार व ३ षटकारांसह ८६ धावा) यांच्या फटकेबाजीच्या जोरावर चेन्नईनं ३ बाद १९२ धावा केल्या. कोलकाताचा ल्युकी फर्ग्युसननं ५६ धावा दिल्या. सुनील नरीननं २६ धावांत २ विकेट्स घेतल्या.
प्रत्युत्तरात शुबमन गिल ( ५१) व वेंकटेश अय्यर ( ५०) यांनी ९१ धावांची सलामी दिली. ११व्या षटकात KKRच्या डावाला कलाटणी मिळाली. शार्दूल ठाकूरनं ११व्या षटकात वेंकटेश ( ५०) व नितीश राणा ( ०) यांना माघारी पाठवले. त्यानंतर कोलकातानं विकेट्सची रांग लावली. सुनील नरीन ( २), गिल (५१), इयॉन मॉर्गन ( ४), दिनेश कार्तिक (९), शाकिब अल हसन (०), राहुल त्रिपाठी ( २) हे अपयशी ठरले. दीपक चहरनं ३१ धावांत १, रवींद्र जडेजानं ३७ चेंडूंत २ विकेट्स घेतल्या. जोश हेझलवूडनंही दोन, तर शार्दूरनं ३८ धावांत ३ विकेट्स घेतल्या.