MS Dhoni 400th T20 Match Of His Career : चेन्नई सुपर किंग्ज संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी याने घरच्या मैदानात रंगलेल्या सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात खास विक्रमाला गवणी घातली. अनकॅप्ड खेळाडू आणि CSK संघाचा कर्णधार धोनी ४०० वा टी-२० सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला आहे. टीृ २० क्रिकेटमध्ये ४०० चा पल्ला गाठणारा तो चौथा भारतीय क्रिकेटर ठरलाय. याआधी रोहित शर्मा (४५६), दिनेश कार्तिक (४१२) आणि विराट कोहली (४०७) यांनी ४०० पेक्षा अधिक टी-२० सामने खेळले आहेत.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
सर्वाधिक टी-२० सामने खेळण्याच्या बाबतीत कॅरेबियन क्रिकेटर आघाडीवर
क्रिकेट जगतात सर्वाधिक टी-२० सामने खेळण्याचा रेकॉर्ज हा वेस्ट इंडिजचा माजी अष्टपैलू खेळाडू केरॉन पोलार्डच्या नावे आहे. त्याने ६९५ टी-२० सामने खेळले आहेत. त्याच्या पाठोपाठ या यादीत ड्वेन ब्रावोचा नंबर लागतो. चेन्नईच्या ताफ्यातून खेळताना दिसलेल्या ब्रावोनं आपल्या कारकिर्दीत ५८२ टी-२० सामने खेळले आहेत. पाकिस्तानचा शोएब मलिक ५५७ सामन्यांसह या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. याशिवाय आंद्र रसेलच्या खात्यात ५४६ टी-२० सामने खेळण्याचा रेकॉर्ड आहे. तो सक्रीय खेळाडूंमध्ये सर्वात आघाडीवर आहे.
रोहित ते KL राहुल! IPL मध्ये सर्वाधिक 'सिक्सर' मारणारे आघाडीचे ५ भारतीय फलंदाज
भारताकडून सर्वाधिक टी २० सामने खेळणारे फलंदाज
- ४५६ - रोहित शर्मा
- ४१२ - दिनेश कार्तिक
- ४०८ - विराट कोहली
- ४०० – एमएस धोनी
- ३४१ - रवींद्र जडेजा
- ३३६ - सुरेश रैना
- ३३४ - शिखर धवन
टी-२० कारकिर्दीत धोनीची कामगिरी
वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराने आतापर्यंत टी-२० मध्ये ३८ च्या सरासरीसह १३५ च्या स्ट्राइक रेटनं ७५६६ धावा केल्या आहेत. यात धोनीने २८ अर्धशतके ठोकली आहेत. विकेटकीपर म्हणून त्याच्या नावावर २२७ झेल आणि ९१ स्टंपिंग आहेत. धोनी आयपीएलमध्ये सर्वाधिक सामने खेळणारा खेळाडू आहे. त्याने आतापर्यंत २७३ सामने खेळले आहेत.
Web Title: MS Dhoni 400 T20 Match Becomes Only 4th Indian Player To Achieve Unthinkable T20 Record
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.