Vaibhav Suryavanshi ( Marathi News ) : काल झालेल्या राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) विरुद्ध गुजरात टायटन्स (Gujrat Titans) सामन्यात राजस्थानच्या रॉयल्स संघाच्या फक्त १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीने (Vaibhav Suryavanshi) कमाल कामगिरी केली. केवळ ३५ बॉलमध्ये त्याने शतक ठोकले. यामुळे काल पुन्हा एकदा वैभव चर्चेत आला. सामन्यानंतर त्याने आयपीएल पर्यंतचा सगळा प्रवास सांगितला. वैभव सूर्यवंशीची आई फक्त ३ तास झोपायची आणि वडीलांनी त्याचे क्रिकेटचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी नोकरी सोडली. कुटुंबाने कठीण परिस्थितीत घर चालवले, पण त्यांनी वैभवचे स्वप्न पूर्ण केले.
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
आज वैभवच्या कठोर परिश्रमाने आणि त्याच्या कुटुंबाच्या त्यागाने त्याला मोठं यश दिले आहे. आयपीएल टी-२० सोबत बोलताना वैभव सूर्यवंशी बोलताना त्याने त्याचा संघर्ष, कुटुंबाचा पाठिंबा आणि भविष्यातील ध्येयांबद्दल सांगितले. वैभव सूर्यवंशी म्हणाला, 'आज मी जे काही आहे ते माझ्या पालकांमुळे आहे. माझ्या सरावामुळे माझी आई रात्री २ वाजता उठायची. ती रात्री ११ वाजता झोपायला जायची आणि फक्त तीन तास झोपायची. पप्पांनी नोकरी सोडली, माझा मोठा भाऊ पप्पांचे काम सांभाळत आहे आणि त्यावर घर चालत आहे आणि बाबा माझ्या मागे आहेत. बाबांनी मला तू हे करशील, तू ते करशील, तू ते करशील असं सांगत आहेत.
२८ एप्रिल रोजी झालेल्या आयपीएल सामन्यात गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्सकडून खेळताना अवघ्या ३५ चेंडूत शतक झळकावून अनेक विक्रम आपल्या नावावर केले.
वैभव सूर्यवंशीने सांगितले की, मी या डावाची तयारी खूप दिवसांपासून करत होतो. आजच्या खेळीमुळे मला बरे वाटले, मी भविष्यात आणखी चांगले करण्याचा प्रयत्न करेन. मला संघात योगदान द्यायचे आहे. यावेळी त्याने कुटुंबाचा संघर्ष सांगितला.
यावेळी वैभवने राजस्थान रॉयल्सच्या चाचणी वेळीचा किस्सा सांगितला. वैभव म्हणाला, जेव्हा मी ट्रायल्ससाठी गेलो होतो तेव्हा विक्रम राठोड सर आणि रोमी सर तिथे होते. रोमी सर संघाचे व्यवस्थापक आहेत. मी त्यावेळी चाचण्यांमध्ये चांगली फलंदाजी केली होती. मग ते म्हणाला की आम्ही तुला आमच्या संघात घेण्याचा प्रयत्न करू. ज्यावेळी मी संघात सामील झालो, तेव्हा मला पहिला फोन त्यांचाच आला. त्यांनी माझे अभिनंदन केले आणि नंतर मला राहुल द्रविड सरांशी बोलायला लावले. ती खूप चांगली भावना होती. कारण राहुल सरांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेणे, काम करणे आणि खेळणे हे सामान्य क्रिकेटपटूसाठी स्वप्नापेक्षा कमी नाही, असंही वैभव म्हणाला.
सिनिअर्संनी केली मदत
"मला वरिष्ठांकडून खूप पाठिंबा मिळतो. कोचिंग स्टाफ देखील मदत करतो. संजू भैया, रायन भैया, यशस्वी भैया, नितीश भैया हे देखील मदतीसाठी तयार आहेत. ते सर्व माझ्याशी सकारात्मक बोलतात. हे लोक मला असा आत्मविश्वास देतात की तुम्ही हे करू शकता, तुम्ही संघाला विजय मिळवून देऊ शकता, यामुळे माझा आत्मविश्वास खूप उंचावला आहे. आयपीएल सामना असल्याने मी थोडा घाबरलो आहे. पण काय होईल, काय होईल याचा असा कोणताही दबाव नाही. सर्वांशी बोलल्यानंतर तो सामान्य होतो", असंही वैभव म्हणाला.