Join us  

Most Awaited Coach!; बीसीसीआयनं पोस्ट केला राहुल द्रविडचा फोटो; फॅन्सनी व्यक्त केली 'मन की बात'!

India tour of Sri Lanka भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं ( BCCI) रविवारी आगामी श्रीलंका दौऱ्यावर जाणाऱ्या टीम इंडियाचा कर्णधार व मुख्य प्रशिक्षक यांचा फोटो पोस्ट केला.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2021 12:15 PM

Open in App

भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं ( BCCI) रविवारी आगामी श्रीलंका दौऱ्यावर जाणाऱ्या टीम इंडियाचा कर्णधार व मुख्य प्रशिक्षक यांचा फोटो पोस्ट केला. या पोस्टमध्ये शिखर धवन व राहुल द्रविड सोबत दिसत आहेत. शिखर धवनच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ तीन वन डे व तीन ट्वेंटी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी आज श्रीलंका दौऱ्यावर रवाना होणार आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील संघ इंग्लंड दौऱ्यावर असल्यामुळे बीसीसीआयनं दुसरा संघ श्रीलंकेला पाठवण्याचा निर्णय घेतला अन् त्या संघाला मार्गदर्शन करण्याची जबाबदारी राहुल द्रविडच्या खांद्यावर सोपवली. टीम इंडियाचा महान फलंदाज राहुल द्रविड याच्याकडे टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षकपद गेल्यानं चाहतेही खुश झाले आहेत आणि बीसीसीआयनं पोस्ट केलेल्या फोटोवर त्यांनी त्यांची 'मन की बात' व्यक्त केली आहे. 

एका चाहत्यानं तर भारतीय संघ याच प्रशिक्षकाची आतुरतेनं वाट पाहत होता, अशी प्रतिक्रिया दिली. 

राहुल द्रविडची सपोर्ट टीम - राहुल द्रविड ( मुख्य प्रशिक्षक), सुधीर आसनानी ( प्रबंधक), पारस म्हाम्ब्रे ( गोलंदाजी प्रशिक्षक), टी दिलीप ( क्षेत्ररक्षण प्रशिक्षक), आशीष कौशिक ( फिजिओ), नारायण पंडित ( फिजिओ), आनंद दाते ( ट्रेनर), एआय हर्ष ( ट्रेनर), अशोक साध ( सहाय्यक प्रशिक्षक - थ्रोडाऊन स्पेशालिस्ट), सौरव अंबडकर  ( थ्रोडाऊन स्पेशालिस्ट), नंदन मांझी ( मालीश), मंगेश गायकवाड ( मालीश), एल वरूण ( विश्लेषक), आनंद सुब्रमण्यम ( मीडिया व्यवस्थापक), अमेय तिलक ) कंटेंट प्रोडुसर), अभिजीत साळवी ( टीम डॉक्टर), रवींद्र धोलपूरे ( भ्रष्टाचार विरोधी आणि सुरक्षा अधिकारी), सुमीत मल्लापुरकर ( लॉजिस्टिक्स मॅनेजर). 

भारतीय संघ  - शिखर धवन ( कर्णधार), पृथ्वी शॉ, देवदत्त पडीक्कल, ऋतुराज गायकवाड, सूर्यकुमार यादव, मनिष पांडे, हार्दिक पांड्या, नितीश राणा, इशान किशन ( यष्टिरक्षक), संजू सॅमसन ( यष्टिरक्षक), युझवेंद्र चहल, राहुल चहर, के गौथम, कृणाल पांड्या, कुलदीप यादव, वरूण चक्रवर्थी, भुवनेश्वर कुमार ( उपकर्णधार), दीपक चहर, नवदीप सैनी, चेतन सकारीयानेट बॉलर्स - इशान पोरेल, संदीप वॉरियर्स, अर्षदीप सिंग, साई किशोर, सिमरजीत सिंग 

स्पर्धेचे वेळापत्रकवन डे मालिका - 13, 16 व 18 जुलै, कोलंबोट्वेंटी-20 मालिका - 21, 23 व 25 जुलै, कोलंबो 

टॅग्स :भारत विरुद्ध श्रीलंकाराहूल द्रविडबीसीसीआयशिखर धवन