Join us

IPL Mini-Auction: IPLच्या लिलावात लागणार १ हजाराहून अधिक खेळाडूंवर बोली, १०९ जण तर या दोन देशातील

IPL Mini-Auction: इंडियन प्रीमियर लीगच्या पुढील (२०२३) हंगामासाठीची तयारी सुरू झाली आहे. तसेच या हंगामासाठी खेळाडूंचा लिलाव डिसेंबर २०२२ मध्ये होणार आहे. तसेच या लिलावाची तारिख निश्चित झाली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2022 09:22 IST

Open in App

मुंबई - इंडियन प्रीमियर लीगच्या पुढील (२०२३) हंगामासाठीची तयारी सुरू झाली आहे. तसेच या हंगामासाठी खेळाडूंचा लिलाव डिसेंबर २०२२ मध्ये होणार आहे. तसेच या लिलावाची तारिख निश्चित झाली आहे. तसेच आयपीएलच्या लिलावासाठी खेळाडूंच्या लिलावाच्या नोंदणीची कालमर्यादाही संपली आहे. त्याची घोषणा बीसीसीआयने केली आहे. यंदाच्या आयपीएलच्या लिलावामध्ये सुमारे १ हजार खेळाडूंवर बोली लागणार आहे. हा लिलावा २३ डिसेंबर रोजी कोची येथे होणार आहे. 

बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार आयपीएलच्या यंदाच्या लिलावासाठी ७१४ भारतीय आणि २७७ परदेशी खेळाडूंसह एकूण ९९१ खेळाडूंनी नोंदणी केली आहे. या खेळाडूंमध्ये इंग्लंडचा स्फोटक फलंदाज बेन स्टोक्स, कॅमरून ग्रीन, जो रूट, मयांक अग्रवाल अशा काही दिग्गजांचा समावेश आहे.

आयपीएलमधील हा लिलाव २३ डिसेंबर रोजी कोची येथे होणार आहे. तसेच त्या दिवशी ८७ हून अधिक खेळाडूंवर बोली लागण्याची शक्यता आहे.  या लिलावासाठी भारतातील एकूण ७१४ खेळाडूंनी आपली नोंदणी केली आहे. तर या यादीत २७७ परदेशी खेळाडूंचा समावेश आहे. असोसिएट्स देशांमधील २० खेळाडूंचा समावेश आहे. तसेच या लिलावामध्ये ऑस्ट्रेलियातील सर्वाधिक ५७ खेळाडूंचा समावेश आहे. कर दक्षिण आफ्रिकेच्या ५२ खेळाडूंनी लिलावासाठी नोंद केली आहे. यूएई, नामिबिया, स्कॉटलंड आणि नेदरलँड्स या देशातील खेळाडूंनीही नोंदणी केली आहे. 

दरम्यान, कोची येथे होणाऱ्या आयपीएल २०२३ च्या मिनी ऑक्शनमध्ये लिलाव प्रक्रिया पार पाडण्यासाठी ह्यूज एडमीड्स हेच लिलावकर्ते म्हणून सहभागी होणार आहेत. प्रकृतीच्या कारणामुळे ते येणार नाहीत, असे बीसीसीआयला वाटत होते. मात्र एड्मीड्स यांनी आपण येणार असल्याचे स्पष्ट केले आहे.  

टॅग्स :आयपीएल लिलावआयपीएल २०२२बीसीसीआय
Open in App