Join us
Daily Top 2Weekly Top 5

चांदनी रात, अनुष्का मेरे साथ... सांगतोय विराट कोहली

न्यूझीलंडमध्ये विराट पत्नी अनुष्का शर्माबरोबर रोमँटिक झाल्याचे पाहायला मिळाले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2019 14:14 IST

Open in App

नेपिअर, भारत विरुद्ध न्यूझीलंड : भारतीय संघ सध्या चांगल्या फॉर्मात आहे. भारताने पहिल्या दोन एकदिवसीय सामन्यांमध्ये विजय मिळवला. भारताचा कर्णधार विराट कोहली हा आक्रमक असल्याचे साऱ्यांनाच माहिती आहे. पण न्यूझीलंडमध्ये विराट पत्नी अनुष्का शर्माबरोबर रोमँटिक झाल्याचे पाहायला मिळाले. नेपिअर येथे या दोघांनी चंद्र आणि चांदण्यांच्या साथीने चांगला वेळ व्यतित केला.

याबाबत कोहली म्हणाला की, " मला आणि अनुष्काला लांब वॉकवर जायला आवडते. नेपिअर एक सुंदर शहर आहे. नेपिअरमध्ये आम्ही मरीन परेड येथे गेलो होतो. चांदण्यांच्या सहवासात आम्ही तिथे गुजगोष्टी केल्या आणि आम्ही हा टाईम चांगलाच एन्जॉय केला." 

विराट आणि अनुष्का हे जेव्हा एकत्र येतात, तेव्हा बऱ्याचदा ते ट्रोल होतात, असे पाहिले गेले आहे. ऑस्ट्रेलियामध्ये विराट गेल्या दीड महिन्यांपासून आहे. विराटच्या नेतृत्वाखाली भारताने कसोटी आणि त्यानंतर एकदिवसीय मालिकाही जिंकली. एकदिवसीय मालिका जिंकल्यानंतर विराट अनुष्काबरोबर फिरायला गेला होता. यावेळी या दोघांनी बरेच फोटो काढले. पण चाहत्यांनी मात्र त्यांना यावेळी चांगलेच धारेवर धरले होते.

टॅग्स :विराट कोहलीअनुष्का शर्माभारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया