Join us  

भारत-इंग्लंड कसोटी मालिकेला 'तेंडुलकर-कूक ट्रॉफी' असं नाव द्या; BCCI-ECB कडे होतेय मागणी

ऑस्ट्रेलियात झालेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीनंतर आता साऱ्यांचे लक्ष भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेकडे लागले आहे.

By स्वदेश घाणेकर | Published: February 10, 2021 4:08 PM

Open in App

ऑस्ट्रेलियात झालेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीनंतर आता साऱ्यांचे लक्ष भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेकडे लागले आहे. इंग्लंडनं पहिली कसोटी जिंकून चार सामन्यांच्या मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे. या मालिकेला तेंडुलकर-कूक असे नाव द्यावे अशी मागणी इंग्लंडचा माजी गोलंदाज माँटी पानेसार ( Monty Panesar) याने केली आहे. BCCI आणि इंग्लंड क्रिकेट बोर्डानं ( ECB) यांनी यासाठी पुढाकार घ्यावा असेही तो म्हणाला.पानेसार यांनी ट्विट करून भारत विरुद्ध इंग्लंड मालिकेला सचिन तेंडुलकर व अॅलेस्टर कूक यांचे नाव द्यावे, या दोघांनी त्यांच्या देशासाठी सर्वाधिक धावा केल्या आहेत. Video : दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार श्रेयस अय्यरचा युजवेंद्र चहलच्या पत्नीसोबत भन्नाट डान्स     त्यानंतर पानेसार यांनी भारत-इंग्लंड मालिकेला वॉन- द्रविड सीरिज असेही नाव द्यायचे का, हाही पर्याय विचारला.  पानेसारनं ट्विटरवर पोल घेतला आहे.   इंग्लंडनं पहिल्या कसोटीत २२७ धावांनी विजय मिळवला आहे. कर्णधार जो रूटनं द्विशतकी खेळी करून त्याची १००वी कसोटी अविस्मरणीय केली.  दरम्यान, इंग्लंडचा माजी कर्णधार अॅलेस्टर कूकनं कोहलीच्या नेतृत्वशैलीवर आश्चर्य व्यक्त केलं.

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडसचिन तेंडुलकर