Join us
Daily Top 2Weekly Top 5

प्रियकराने केला प्रेयसीचा सौदा,लग्नाचे आमिष दाखवून उकळले पैसे

उच्चशिक्षित, चांगल्या पगाराच्या नोकरीला भुलून तिने त्याला होकार दिला. त्याने लग्नाचे आमिष दाखवून तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. त्याने याचे व्हिडीओ रेकॉर्डिंग केले.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2018 06:21 IST

Open in App

मुंबई : उच्चशिक्षित, चांगल्या पगाराच्या नोकरीला भुलून तिने त्याला होकार दिला. त्याने लग्नाचे आमिष दाखवून तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. त्याने याचे व्हिडीओ रेकॉर्डिंग केले. आणि हाच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत तिच्याकडून लाखो रुपये उकळले. तिने पैसे देणे बंद केल्याने त्याने मित्राकडेच तिचा सौदा केला; आणि तरुणीला त्याच्यासोबत शारीरिक संबंध ठेवण्यासाठी धमकाविल्याचा धक्कादायक प्रकार ग्रॅण्ट रोडमध्ये उघडकीस आला आहे. या प्रकरणी डी. बी. मार्ग पोलिसांनी धरन शहा याला अटक केली आहे.तक्रारदार नेहाची (नावात बदल) मार्च महिन्यात शहासोबत ओळख झाली. शहा हा सोन्याच्या दुकानात व्यवस्थापक म्हणून नोकरी करतो. त्याने नेहाशी ओळख केली. ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले. त्याने नेहाला लग्नाचे आमिष दाखविले. दोघांमध्ये शारीरिक संबंध झाले.याच दरम्यान शहाने त्याचे व्हिडीओ रेकॉर्डिंग केले. नेहाकडून त्याने कॅनडाला जाण्यासाठी पैशांची मागणी केली. मात्र तिने पैसे देण्यास नकार देताच, त्याने दोघांमधील शारीरिक संबंधाची व्हिडीओ रेकॉर्डिंग सोशल मीडियावर टाकण्याची धमकी दिली. या प्रकाराने नेहाला धक्काच बसला.नेहाच्या भीतीचा फायदा घेत त्याने तिच्याकडून तब्बल ४ लाख १५ हजार रुपये उकळले. तिने पैसे देणे बंद केल्यानंतर त्याने मित्राकडेच नेहाचा सौदा केला आणि तिला मित्रासोबत शारीरिक संबंध करण्यासाठी धमकावले. अखेर शहाचे अत्याचार वाढत असल्याने नेहाने पोलिसांत धाव घेतली.नेहाच्या तक्रारीवरून डी. बी. मार्ग पोलिसांनी शहाविरुद्ध बलात्कार, धमकाविण्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. याच गुन्ह्यांत शहाला अटक करण्यात आली. पुढे हा गुन्हा अधिक तपासासाठी एल.टी. मार्ग पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. याप्रकरणी तपास पूर्ण झाल्यावर पोलीस आरोपपत्र दाखल करतील़ आरोपींवर आरोप निश्चिती झाल्यावर याचा खटला सुरू होईल़

टॅग्स :गुन्हेगारी